29.2 C
Ratnagiri
Saturday, July 19, 2025

हरचिरी धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा

उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा...

आरजू फसवणूकप्रकरणी गुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा

रत्नागिरीमध्ये आरजू नावाच्या कंपनीने व्यवसाय देतो, असे...

पावसाने जनजीवन विस्कळीत, झाड पडून तिघे जखमी

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार...
HomeMaharashtraगणपतीसाठी एसटीच्या पाच हजार गाड्या - परिवहनमंत्र्यांची माहिती

गणपतीसाठी एसटीच्या पाच हजार गाड्या – परिवहनमंत्र्यांची माहिती

आरक्षण २२ जुलैपासून सुरू होत आहे.

गणरायाच्या आगमनासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले असून, कोकणात एसटीच्या जादा पाच हजार बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. महामंडळाने २३ ऑगस्ट ते सात सप्टेंबरदरम्यान या जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ते गणपती उत्सवाच्या जादा वाहतुकीच्या अनुषंगाने मंत्रालयात आयोजित बैठकीत बोलत होते. या बैठकीला महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले की, “गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना गणपती बाप्पा, कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतूट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी नफ्या-तोट्याचा विचार न करता एसटी धावत असते.

यंदा सुमार पाच हजार जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील. दरम्यान, या बसच्या आरक्षणासाठी npublic.msrtcors.com संकेतस्थळावर उपलब्ध करून या देण्यात येत असून, या बसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या अॅपव्दारे उपलब्ध होणार आहे. आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी देखील एसटी महामंडळाने पाच हजार दोनशे जादा बस सोडल्या होत्या. त्याला भाविकांचा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे गणपती उत्सवासाठीदेखील एसटीने पाच हजार जादा बस उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले आहे.

२२ जुलैपासून आरक्षणाला सुरुवात – गणपती उत्सवासाठी जादा बसमध्ये व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणासाठी अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकीटदरात सवलत दिली जाणार आहे. हे गट आरक्षण २२ जुलैपासून सुरू होत आहे. २३ ऑगस्टपासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बस सोडण्यात येणार आहेत. गेल्यावर्षी ४,३०० बसगाड्या सोडण्यात आल्या होत्या.

RELATED ARTICLES

Most Popular