26.2 C
Ratnagiri
Friday, July 25, 2025

रत्नागिरीतील ‘त्या’ रस्त्यांची मलमपट्टी…

शहरातील अंतर्गत आणि मुख्य रस्त्याचे पॅचवर्क पुरते...

महायुती, आघाडीत जागावाटप कळीचा मुद्दा आगामी रत्नागिरी पालिका निवडणूक

शासनाने लोकसंख्येच्या आधारे राज्यातील नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा...
HomeRatnagiriमाचाळजवळ तपासणी नाका होणार सुरू…

माचाळजवळ तपासणी नाका होणार सुरू…

पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे तर कधी मद्यसेवनाच्या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होतो.

लांजा तालुक्याच्या पूर्व दिशेला असलेले मिनी महाबळेश्वर म्हणून नावारूपाला आलेले माचाळ गाव पर्यटनाच्यादृष्टीने विकसित होत आहे. येथील घनदाट जंगल, अचानक नजरेस पडणारे वन्यजीव, थंडगार पाणी, दाट धुके, मुचकुंदी ऋषी यांची गुहा, येथील लोकवस्तीची जीवनपद्धती अनुभवता येते. इतिहासाच्या पाऊलखुणा असलेल्या माचाळ गावापासून अवघ्या दोन किमी अंतरावर विशाळगड आहे. सह्याद्रीच्या कडेवर असलेली मुचकुंदी ऋषींची गुहेला पर्यटक आवर्जून भेट देत असतात. हीलस्टेशन म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या माचाळ गावाकडे पर्यटकांची पावले उन्हाळी, पावसाळी व हिवाळी या तीनही ऋतूंमध्ये वळत आहेत. त्यामुळे लांजा तालुक्याच्या पर्यटन विकासाला माचाळच्या रूपाने चालना मिळू लागली आहे. येथील पर्यटनाला अधिक बळकट करणे गरजेचे असल्याचे मत अभ्यासक, सुज्ञान नागरिकांमधून व्यक्त होत आहे. सध्या पावसाळा सुरू असून, माचाळचे वातावरण येथील पर्यटकांना अधिक आकर्षित करत आहे.

त्यामुळे माचाळला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. येणाऱ्या पर्यटकांना जेवण, नाश्ता करून देण्याची व्यवस्था येथील नागरिकांनी स्वतःच्या घरांमध्ये सुरू केली आहे. भविष्यात येथे हॉटेल, दुकानेही उभी राहू शकतात; मात्र येथील पर्यटकांवर स्थानिक ग्रामपंचायत व प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे तर कधी मद्यसेवनाच्या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होतो. त्यासाठी पालू-माचाळ ग्रुप ग्रामपंचायतीकडून पावले उचलण्यात आली आहेत. माचाळ पर्यटनाच्या प्रवेश ठिकाणी एक चेकनाका उभारण्यात येणार असल्याचे पालू-माचाळ ग्रामपंचायतीचे सरपंच सागर गाडे यांनी सांगितले. त्यासाठी ग्रामपंचायतीने हालचाली सुरू केल्या असून, लवकरच माचाळ पर्यटन ठिकाणी मद्यसेवन व अतिउत्साही पर्यटकांना चाप बसणार आहे. यासह तपासणीनाक्याच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला उत्पन्नही प्राप्त होणार आहे.

निसर्गसौंदर्याची भरभराट – पावसामध्ये दाट धुके, थंड वारा, हिरवीगार वनराई, निळेशार सह्याद्रीचे डोंगरकडे, कोसळणारे छोटे-मोठे धबधबे, उंच पर्वतरांगांवरून दिसणारा लांजा व संगमेश्वर तालुक्यातील गावांचा भूभाग असे निसर्गसौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते.

RELATED ARTICLES

Most Popular