26.5 C
Ratnagiri
Thursday, July 31, 2025

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चुनही दुरवस्थाच…

कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११...
HomeRatnagiriमच्छीमारी सुरू झाल्यानंतर सेस आकारणी

मच्छीमारी सुरू झाल्यानंतर सेस आकारणी

१ ऑगस्टपासून मच्छीमारी बंदी कालावधी संपुष्टात येत आहे.

बाजार समितीच्या उत्पन्नात भर पडावी यासाठी शासननियमानुसार, विविध उत्पादनांवर सेस आकारला जातो. सेस गोळा करण्यासाठी जिल्ह्यात ७ सात नाके आहेत त्यातील ४ बंद आहेत. ते यंदापासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मासेमारी सुरू झाल्यानंतर दरवर्षीप्रमाणे मच्छीवाहतुकीवरील सेस आकारण्यास सुरुवात केली जाईल. सेस नियमाप्रमाणे आकारला जात नसल्याचा मुद्द लेखा परीक्षणात उपस्थित केला होता. त्यामुळे यावर्षी सेसची रक्कम सर्वांबरोबर चर्चा निश्चित केली जाईल, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश सावंत यांनी दिली. बाजार समितीची मासिक सभा बुधवारी (ता. २३) झाली. या वेळी बाजार समितीचे उत्पन्न वाढवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा झाली. त्यामध्ये माशांवरील सेस आकारण्याविषयीचा मुद्दा पुढे आला.

१ ऑगस्टपासून मच्छीमारी बंदी कालावधी संपुष्टात येत आहे. त्यानंतर मासेमारीला सुरुवात होईल. पाऊस संपल्यानंतर म्हणजेच सप्टेंबर महिन्यात खऱ्या अर्थाने मासेमारी व्यवसायाला जोर येतो. माशांवर आकारण्यात येणारा सेस हा बाजार समितीच्या उत्पन्नाचा मोठा पर्याय आहे. तसेच, नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या लेखा तपासणीतही संबंधितांकडून मच्छीवरील सेस नियमानुसार घेतला जात नसल्याची विचारणा केली होती. या मुद्द्यांवर बाजार समितीच्या बैठकीत पदाधिकारी व संचालकांनी चर्चा केली. याबाबत स्थानिक पालकमंत्री, सर्व आमदार, खासदारांसह मच्छीमारांना विश्वासात घेऊन नियमानुसार सेस आकारण्यास सुरुवात केली जाणार आहे.

सेसची रक्कम पुढील मासिक सभेत ठरवण्यात येणार आहे. बाजार समितीने जिल्ह्यातील सर्व नाके सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील ७ नाक्यांपैकी ४ बंद होते. त्यातील भिंगळोली, पावस, भरणे हे नाके पुन्हा सुरू केले जाणार आहेत. दापोलीतील हर्णे येथील मासळी या मार्गे नेण्यात येते. तसेच जळाऊ लाकडाचीही मोठी वाहतूक येथून होते. हे नाके सुरू झाल्यास संबंधितांवर सेस आकारणे सोपे जाणार आहे. पोफळी, साखरपा, कुवारबाव आणि राजापूरमधील कारवल या ठिकाणी बाजार समितीचे नाके सुरू आहेत, असे सावंत यांनी सांगितले.

साडेतीन लाख रुपये नफा – मागील चार वर्षे बाजार समिती तोट्यात होती; मात्र यंदा ती साडेतीन लाख रुपयांनी नफ्यात आली आहे. हा नफा वाढवण्यासाठी बाजार समितीने कोंबडी, अंडी, शेळी-मेंढी वाहतूक, काजू बी विक्रेते, जळाऊ लाकूड, खैर वाहतूक यावर सेस आकारला होता. गावागावांत काजू बी खरेदीसाठी फिरणाऱ्या भैयांवरही लक्ष्य केंद्रित केले होते. त्यामुळे यावर्षी सेस वसुलीची रक्कम वाढली. त्याचा फायदा यावर्षी दिसून येत आहे, असे सावंत यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular