26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeMaharashtraरशिया, जपानला त्सुनामीची धडक प्रशांत महासागरात ८.८ रिश्टर तीव्रतेचा भूकप

रशिया, जपानला त्सुनामीची धडक प्रशांत महासागरात ८.८ रिश्टर तीव्रतेचा भूकप

रशियाच्या किनारपट्टीपासून हा केंद्रबिंदू ११९ किलोमीटर अंतरावर होता.

रशियाच्या अतिपूर्वेकडील भागाला आज सकाळी साडेआठ वाजता (जपानमधील वेळेनुसार) शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ८.८ इतकी नोंदली गेली. आतापर्यंत नोंदल्या गेलेल्या सर्वांत मोठ्या भूकंपांपैकी हा एक आहे. उत्तर प्रशांत महासागरात झालेल्या या भूकंपामुळे रशियासह जपान, हवाई बेटे आणि अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीला सुनामीच्या लाटा कमी-अधिक तीव्रतेने धडकल्या. या भूकंपामुळे जीवितहानी झाली नसून मोठ्या प्रमाणावर वित्तहानीही झालेली नाही. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव समुद्र किनाऱ्यांवर न जाण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. रशियाच्या किनारपट्टीपासून हा केंद्रबिंदू ११९ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपानंतर रशियाच्या कामकॅटका किनारपट्टीवर सुनामीच्या लाटा धडकून किनारा पाण्याखाली गेला. सुनामीचा इशारा आधीच मिळाल्याने या भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले.

रशियाच्या अतिपूर्व भागाच्या दक्षिणेला असलेल्या आणि जपानच्या ईशान्य भागात असलेल्या प्रशांत महासागरात २०.७ किलोमीटर खोलीवर भूकंपानंतर लगेचच जपान आणि हवाई बेटांनाही सुनामीचा इशारा देण्यात आला. त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांनी समुद्र किनाऱ्यांपासून दूर जाण्यास सुरुवात केल्याने रस्त्यांवर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. भूकंपामुळे रशिया आणि जपानच्या किनारपट्टीवरील भागांमध्ये काही इमारतींची पडझड झाली. यामध्ये जपानमध्ये एक जण जखमी झाला. रशियातही काही जण जखमी झाले असले तरी स्थानिक प्रशासनाने निश्चित माहिती जाहीर केलेली नाही. भूकंपानंतर ६.९ रिश्टर तीव्रतेपर्यंतचे धक्के बसल्याचीही नोंद झाली. जपानला २०११ मध्ये नऊ रिश्टर तीव्रतेच्या धक्का बसला होता. यामुळे सुनामीची मोठी लाट धडकून फुकुशिमा अणु प्रकल्पाचे नुकसान झाले होते.

लाटांची उंची तीन ते चार मीटर – भूकंपामुळे रशियातील काम कॅटका किनारपट्टीवर तीन ते चार मीटर उंचीच्या लाटा धडकल्या. जपानच्या उत्तरेकडील होक्काईदो बेटांना ६० सेंटिमीटर उंचीच्या, तर अलास्काला १.४ फूट उंचीच्या लाटा धडकल्या. भूकंपानंतर काही तासांनी हवाई बेटांनी त्सुनामीचा इशारा मागे घेतला. जपाननेही काही भागांसाठी धोक्याचा इशारा मागे घेतला आहे. मोठ्या त्सुनामीची शक्यता आता कमी असली तरी कमी उंचीच्या लाटा किनारपट्टीला धडकण्याची शक्यता असल्याने रशिया, जपानसह अमेरिकेतील कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन आणि कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया या प्रांतांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular