दिवसात अनेकवेळा लाईट जात आहे…. तरीपण अवाच्यासवा बिले येत आहेत….. घरच्या मीटरला एक लाख रुपये बिल….. हे कोणते कामकाज सुरू आहे? …. व्यापारी तडफतायत,… सामान्य नागरिक हैराण झालाय,… त्यावर स्मार्ट मीटर चे धोरण,…. नेमक चाललंय काय.?… सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणार असाल तर लक्षात ठेवा इथे फिरू देणार नाही, अशा शब्दात माजी आम दार रमेशभाई कदम, शिवसेनेचे नेते बाळा कदम यांनी महावितरण अधिकाऱ्यांना सज्जड इशारा दिला. चिपळूणचा दणका ज्यावेळी बसेल ना… त्यावेळी कार्यालयात बसणे कठीण होईल, असेही थेट सुनावत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समोरासमोर ठणकावले. महावितरण चिपळूण विभागाच्या अनागोंदी, मनमानी आणि गलथान कारभाराविरोधात महाविकास आघाडी, चिपळूणच्यावतीने माजी आ. रमेशभाई कदम, (नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), सौ. सोनलक्ष्मी घाग, (जिल्हाध्यक्ष, आय काँग्रेस), बाळा कदम (विधानसभा क्षेत्र प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), लियाकत शहा (तालुकाध्यक्ष, आय काँग्रेस), बळीराम गुजर (तालुकाप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), रतन पवार (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
कार्यकारी अभियंता / सहाय्यक अभियंत्यांना सादर करण्यात आलेल्या या निवेदनात नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रमुख समस्या मांडण्यात आल्या असून, त्यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी रमेशभाई कदम, बाळा कंदम, सोनलक्ष्मी घाग, लियाकत शहा, बळीराम गुजर, पत्रकार सतीश शिंदे, इम्तियाज कडू, साजिद सरगुरोह यांनी चर्चेत भाग घेतला. तसेच शहर व ग्रामीणमधील काही नागरिकांनी देखील समस्या मांडल्या. महाविकास आघाडीने दिलेल्या निवेदनात खालील प्रमुख मुद्यांचा उल्लेख करण्यात आला आहे:
स्मार्ट मीटरची सक्ती – महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना, अटी-शर्ती वा जनजागृती न करता स्मार्ट मीटर बसवले जात असून यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम व असंतोष वाढला आहे.
वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित – शहरी तसेच ग्रामीण भागांत वारंवार वीज खंडित होत असल्याने शिक्षण, व्यवसाय, वैद्यकीय सेवा आणि घरगुती कामकाजावर गंभीर परिणाम होत आहे.
नगरपरिषद यांच्यातील वादाचा त्रास नागरिकांना – नगरपरिषदेचे येणे थकीत असल्याचे कारण देत ३३/११ के.व्ही. उपकेंद्रांचा वीज पुरवठा अचानक खंडित करण्यात आला होता, ज्यामुळे संपूर्ण शहरात पाणीपुरवठा आणि इतर सेवा ठप्प झाल्या होत्या. चुकीचे वीजबिल, दिरंगाई आणि तांत्रिक त्रुटी नागरिकांना वेळेवर वीजबिल न मिळणे, चुकीचे बिलिंग, सेवा केंद्रातील विलंब आणि तांत्रिक बिघाडांमुळे होणारा त्रास यांचाही निषेध करण्यात आला आहे.
महावितरणचे आश्वासन – यावर महावितरणाचे कार्यकारी अभियंता, चिपळूण यांनी सर्व मुद्दे, समस्या आणि मुद्दे ऐकून घेऊन घेतले व शासनाशी चर्चा करून आपला विरोध शासनाला कळवून पुढील निर्णय होईपर्यंत स्मार्ट मीटर लागू करण्याबाबत आता तात्पुरती स्थगिती देत आहे, असे सांगितले. तसेच इतर सर्व मुद्यांबाबत योग्य तो विचार करू असे आश्वासन देखील दिले.
जनआंदोलनांचा इशारा – महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर लवकरच या गंभीर सम स्यांकडे महावितरणने लक्ष दिले नाही, तर नागरिकांच्या सहकार्याने उग्र जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
अनेक दिग्गजांची उपस्थिती – यावेळी सुधीरभाऊ शिंदे, दादा आखाडे, यशवंत फके, अन्वर जबले, शमून घारे, गुलजार कुरवले, अजित गुजर, सचिन शेटे, विजय शिर्के, जनार्दन पवार, बापू चिपळूणकर, विलास चिपळूणकर, प्रवीण रेडीज, संतोष सावंत देसाई, महेंद्र काणेकर, दत्ताराम यादव, सिकंदर पालोजी, राजेंद्र गायकवाड, वैभव खेडेकर, गंगाराम मुंढे, सुधाकर जाधव, गणेश खेतले, राकेश दाते, मोहन खापरे, समीर सावंत, संजय रेड्डीज, अश्रफ फेबल, नियाज संगे, रफिक मोडक, राजन खेडेकर, सचिन उर्फ भैया कदम, मनोज शिंदे, पार्थ जागुष्टे, प्रशांत मुळ्ये, अनंत खैर, सुभाष गुरव, मोहन खापरे, गणेश खेतले, महादेवबुवा खेतले, रवींद्र खेतले, आकाश कदम, राहुल गुरव, तेजस घाणेकर, संदीप चव्हाण, निलेश डिके, श्री नारकर, बळीराम मोरे, साहिल शिर्के, निखिल निकम, दिनकर जाधव, सचिन चोरगे, निर्मलाताई जाधव, वीणा जावकर, ऐश्वर्या घोसाळकर, रंजिता ओतारी, वैशाली शिंदे, रुही खेडेकर, निशिगंधा बांदेकर, तेजस्वी किंजळकर, सायली कदम, सीमा चाळके, रहमान जबले, विभावरी जाधव, सफा गोटे, सावित्रीताई होमकळस, उज्वला जाधव, सुचित्रा खरे, माधुरीताई शिंदे, तटकरे आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक उपस्थित होते.