31.5 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

दांडगा वशीला असलेला कोकरे महाराज पोलीस कोठडीत !

या भगवान कोकरे नावाच्या महाराजाचा लोटे व...

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...
HomeRajapurराजापूर तालुक्यामध्ये आढळली अतिदुर्मीळ 'हंसतुरा' प्रजाती

राजापूर तालुक्यामध्ये आढळली अतिदुर्मीळ ‘हंसतुरा’ प्रजाती

या प्रजातीचे संरक्षण आणि संवर्धन झाले नाही तर ही पूर्णपणे नष्ट होऊ शकते.

राजापूर तालुक्यात पावसाळ्यात उगवणारी, एक अतिदुर्मीळ आणि इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झव्हेंशन ऑफ नेचरच्या धोक्यात असलेल्या प्रजातींच्या रेडलिस्टमध्ये ‘अतिधोकाग्रस्त’ या वर्गवारीत असलेली ‘अपोनोजेटॉन नटेशी’ नावाची एक पाणवनस्पती आढळते. या वनस्पतीचे साताऱ्यात आढळणाऱ्या ‘वाय’ तुऱ्याशी जरी साधर्म्य आढळत असले तरी श्रीरंग यादव आणि अरुण चांदोरे यांनी केलेल्या शास्त्रशुद्ध अभ्यासामुळे ही प्रजाती पूर्णपणे वेगळी असून, तिला ‘हंसतुरा’ असेही म्हटले आहे. केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे माजी सल्लागार डॉ. एस. नटेश यांच्या नावावरून या वनस्पतीला ‘अपोनोजेटॉन नटेशी’ हे नाव दिले गेले. महाराष्ट्रात फक्त राजापूर पट्टयात ही प्रजाती अतिशय थोड्या जागेपुरती मर्यादित आहे. देशात फक्त तीन ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात याचा आढळ आहे आणि तेही अत्यंत थोड्या प्रमाणात अत्यंत प्रदेशनिष्ठ असल्याने जर का या प्रजातीचे संरक्षण आणि संवर्धन झाले नाही तर ही पूर्णपणे नष्ट होऊ शकते.

ही प्रजाती दोन ते अडीच मीटर खोल पाण्यातच वाढते. पाण्याखाली याचा कांदा वाढतो, पानेही पाण्यातच असतात. देठ दोन-एक मीटर वाढून पाण्याच्या वर याचा तुरा येतो, तो हंसपक्ष्याच्या चोचीसारखा दिसतो. त्यामुळे त्याला ‘हंसतुरा’ म्हटले जाते. या तुऱ्यावर ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात छोटी छोटी फुले येतात आणि मग फळे धरतात; मात्र या वनस्पतीचे परागीभवन कसे होते या विषयी अजूनही फारशी माहिती उपलब्ध नाही. सध्या हे तुरे, वापरून सोडून दिलेल्या खोल चिरेखाणीत साठलेल्या पाण्यात वाढले आहेत. पावसाळा संपल्यावर त्यातील पाणी आटल्यावर जर का त्या खाणीच्या मालकांनी पुन्हा ती चिरेखाण वापरात आणायचा निर्णय घेतला तर तिथून ही वनस्पती पूर्णपणे नष्ट होण्याचा धोका आहे.

दृष्टिक्षेपात… – महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातच आढळ. संवर्धनासाठी प्रयत्न हवेत. दोन ते अडीच मीटर खोल पाण्यात वाढ. पाण्याखाली कांदी वाढते, पानेही पाण्यातच

RELATED ARTICLES

Most Popular