24.9 C
Ratnagiri
Monday, December 8, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriलांज्यात डंपिंग ग्राउंड हटविण्यासाठी कोत्रेवाडी नागरिकांचे सलग तिसऱ्या दिवशी उपोषण

लांज्यात डंपिंग ग्राउंड हटविण्यासाठी कोत्रेवाडी नागरिकांचे सलग तिसऱ्या दिवशी उपोषण

अपेक्षित उत्तर न मिळाल्याने कोत्रेवाडी नागरिक आपल्या उपोषणावर ठाम राहिले आहेत.

शहरातील कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डम्पिंग ग्राउंड रद्द किंवा अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्या संदर्भातं नगरविकास मंत्रालयाकडून कार्यवाही होत नाही तोपर्यंत कोत्रेवाडी येथील प्रस्तावित जागेत कचरा टाकण्याबाबत कार्यवाही होणार नाही असे पत्र आम्हाला द्या अशी मागणी कोत्रेवाडी उपोषणकर्त्या नागरिकांनी लांजा मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याकडे केली. मात्र तसे पत्र देण्यास त्यांनी असमर्थता दर्शविल्याने डंपिंग ग्राउंड हटविण्या संदर्भात कोत्रेवाडी नागरिकांनी आपले उपोषण सलग तिसऱ्या दिवशी चालूच ठेवले आहे. गुरूवार दि. १४ ऑगस्टपासुन सुरू झालेले कोत्रेवाडी नागरिकांचे बेमुदत उपोषण शुक्रवारी १६ ऑगस्ट रोजी सलग तिसऱ्या दिवशी देखील सुरू होते. उपोषण सुरु असताना आजच्या तिसऱ्या दिवशी देखील म्हणजे १६ ऑगस्ट रोजी लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांनी उपोषणकर्त्या नागरिकांची भेट घेतली नाही. त्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी उपोषणस्थळी भेट दिली. मात्र नागरिकांनी डम्पिंग ग्राउंड रद्द करण्याबाबत केलेल्या मागणीबाबत त्यांनी कोणत्याही प्रकारे ठोस उत्तर न दिल्याने कोत्रेवाडी नागरिकांनी आपले उपोषण तिसऱ्या दिवशी देखील सुरूच ठेवले होते. तत्पूर्वी शुक्रवारी, १५ ऑगस्ट रोजी कोत्रेवाडी नागरिकांनी उपोषण चांगलेच गाजविले. माकडा माकडा हुप हुप…. ओसाड जमिनीतलं खाल्लस तूप…. अधिकारी बसलेत खुर्चीवर…. जनता रडते रस्त्यावर…. स्वातंत्र्यदिनी कोत्रेवाडी नागरिकांना रस्त्यावर आणणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो…. अशा विविध घोषणा देत स्वातंत्र्य दिनी कोत्रेवाडी नागरिकांनी लांजा तहसील परिसर दणाणून सोडला.

दरम्यान, आजच्या शनिवारी १६ ऑगस्ट रोजी सलग तिसऱ्या दिवशी देखील कोत्रेवाडी नागरिक उपोषणाला बसलेले आहेत. जोपर्यंत प्रशासन आम्हाला डम्पिंग ग्राउंड रद्द होण्याबाबत किंवा स्थगिती मिळण्याबाबत कोणतेही प्रकारचे ठोस लेखी उत्तर देत नाही तोपर्यंत या विरोधातील आपले उपोषण आणि संघर्षाचा लढा हा कायम असाच चालू ठेवण्याचा निर्धार कोत्रेवाडी नागरिकांनी केला आहे. शनिवारी सायंकाळी निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी यांनी कोत्रेवाडी नागरिकांची भेट घेतली होती. मात्र त्यांच्याकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्याने कोत्रेवाडी नागरिक आपल्या उपोषणावर ठाम राहिले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular