24.4 C
Ratnagiri
Friday, February 13, 2026

भारत बंदला प्रतिसाद, रत्नागिरीत बँक कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी, जोरदार निदर्शने

देशातील ११ केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या गुरूवारच्या...

चिपळूण शहराच्या निळ्या, लाल पूररेषेच्या फेरसर्वेक्षणासाठी समिती

राज्यभरातील पूरबाधित शहरांमध्ये नद्यांलगत मारलेली निळ्या व...

चिपळुणात आजपासून साहित्य संमेलन उद्या उपमुख्यमंत्री तर रविवारी मुख्यमंत्री येणार

चिपळूण तालुक्यातील मांडकी-पालवण येथील कृषिभूषण डॉ. तानाजीराव...
HomeRatnagiriगणेशोत्सवापूर्वीच वाहतूक कोंडीची झलक, दोन्ही मार्गिकेवर एकाच दिशेने वाहने

गणेशोत्सवापूर्वीच वाहतूक कोंडीची झलक, दोन्ही मार्गिकेवर एकाच दिशेने वाहने

चाकरमान्यांसह अनेक पर्यटक या सुटीचा आनंद घेण्यासाठी कोकणात दाखल झाले होते.

गणेशोत्सव संभाव्य काळात होणाऱ्या वाहतूककोंडीची झलक चाकरमान्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी अनुभवली. रत्नागिरी जिल्ह्यातून जाणाऱ्या या मार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या. प्रत्येकाला पुढे जायची घाई असल्यामुळे दोन्ही मार्गिकेवर एकाच दिशेने वाहने धावत होती. त्यामुळे ठिकठिकाणी कोंडी झाली. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या रेल्वे, एसटी फुल्ल आहेत तर खासगी गाड्यांचे तिकीट सर्वसामान्य कोकणवासीयांना परवडत नाही. तरीही ‘कोकण म्हणजे गणेशोत्सव आणि गणेशोत्सव म्हणजे कोकण’ ही परंपरा कायम ठेवण्यासाठी मुंबईतील चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात येतोच. नारळी पौर्णिमेनंतर ही तयारी वेगाने सुरू होते.

१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाची सुटी, १६ ऑगस्टला दहीहंडी आणि १७ ऑगस्टला रविवार असल्यामुळे सलग तीन सुट्या जोडून आल्या. त्यामुळे चाकरमान्यांसह अनेक पर्यटक या सुटीचा आनंद घेण्यासाठी कोकणात दाखल झाले होते. खेड, चिपळूण संगमेश्वर या भागातील महामार्गावर वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. महामार्ग खराब असल्याने अपघाताची भीती चाकरमान्यांना असून, कोंडी तर आमच्या पाचवीलाच पुजली आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

Most Popular