27.2 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeChiplunचिपळूणकर पूराच्या संकटातून बचावले - आ. शेखर निकम

चिपळूणकर पूराच्या संकटातून बचावले – आ. शेखर निकम

नलावडा बंधारा ठरला चिपळूणसाठी मोठा आधार.

पाण्याने धोक्याची पातळी ओलांडूनही शहरात कोणताही धोका निर्माण न होता शहराला सुरक्षिततेकडे नेण्याच्या आ. शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश आले असून त्याबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. चिपळूणमध्ये तर तीन दिवसात उच्चांकी पाऊस कोसळला आहे. धो धो कोसळणारा पाऊस आणि कोळकेवाडी धरणातून होणार पाण्याचा विसर्ग याने चिपळूणमध्ये पुन्हा महापूर येणार याची खात्रीच साऱ्यांना झाली होती. याच खात्रीने जनतेची धडधड वाढली आणि २०२१ च्या महापूराच्या आठवणीने साऱ्याचा काळजाचा ठोकाच चुकला होता. आ. निकमांचे योगदान २०२१ च्या महापुरानंतर आ. शेखर निकम यांनी चिपळूण शहरावर लक्ष केंद्रित केले. उध्वस्त झालेले चिपळूण पुन्हा उभे करताना असा महापूर पुन्हा चिपळूणमध्ये येऊ नये या साठी प्रचंड मेहनत घेत त्यानी काम सुरू केले. मंत्रालय आणि स्थानिक प्रशासन असा सारा मेळ घालत त्यांनी अनेक योजनांच्या माध्यमातून काम सुरू केले.

चिपळूण वाचले – अनेक शहरे पाण्याखाली आली होती. मुंबापुरी पाण्याखाली आली, तिथे चिपळूणचे काय? वाशिष्ठीने अक्राळविक्राळ रूप धारण केले होते. प्रशासनाने धोक्याचा इशारा दिला, मात्र आ. निकम यांनी गेल्या ३ वर्षात महापूर मुक्तीसाठी केलेल्या कामांने वाशिष्ठीला झुकावे लागले होते. म्हणूनच चिपळूण शहर धोक्याची स्थिती असतानाही धोक्याचे बाहेर राहिले आहे.

नलावडा ठरला मोठा आधार – २००५ च्या पुरावेळी वाशिष्ठीला असणारा नलावडा बंधरा तुटला होता. त्यानंतर वाशिष्ठीच्या पुराचे पाणी थेट शहरात घुसत होते. शहरात कायम स्वरूपी महापूर येत असे. मात्र आ. शेखर निकम यांनी २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आणि नलावडा बंधारा बांधून घेतला. कायमचा महापूराचा धोका संपवून टाकला. या वर्षीच अतिशय महत्वाचा असणारा आणि जनतेच्या सुरक्षेसाठी असणारा हा बंधारा बांधल्याने शहरातील अनेक विभाग सुरक्षित राहिले असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. गाळ मुक्ती अभियान राबवून त्यासाठी खास निधी आणून आ. शेखर निकम यांनी वाशिष्ठीतील गाळ काढताना वाशिष्ठीचे पात्र ही रुंद केले आहे. उक्ताड नाईक पूल गांधी बेट ट्रिम झाले पेठमाप बामणे बेट काढले गेले बहादूरशेख ब्रिटिश पूल पाडला गेला शिवनदीची साफसफाई झाली कोळकेवाडी धरण प्रशासनावर अंकुश अशा अनेक उपाय योजना आ. शेखर निकम यांनी राबविल्या आहेत. त्याबद्दल आ. शेखर निकम यांना जनता धन्यवाद देत आहे. चिपळूणला पुरापासून मुक्ती देण्याचे काम निकम यांच्या प्रयत्नांनी झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular