काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात वाहनांच्या हॉर्नच्या आवाजासंबंधी नियमांमध्ये बदल करणार असल्याची घोषणा केली होती. कर्णकर्कश हॉर्नच्या ऐवजी, सुमधुर संगीत ऐकायला मिळेल या संदर्भिय त्यांनी घोषणा केली होती. परंतु, विविध भारतीय वाद्यांच्या आवाजाचे नवीन हॉर्न वाहनांमध्ये बसविण्याबाबत नितीन गडकरी यांनी केलेल्या घोषणेवर, प्रसिद्ध श्रवण तज्ञ डॉ. कल्याणी मांडके यांनी आक्षेप घेतला असून, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला कायदेशीर नोटीस बजावली आहे.
डॉ. कल्याणी मांडके यांनी या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय मोटार वाहन उत्पादक कंपन्यांना हॉर्नच्या संगीतमय आवाजाबददल आक्षेप नोंदवत, कुठलेही नवीन धोरण, कल्पना विज्ञानाधारित असावी असं सांगत अँड अक्षय देसाई, अँड असीम सरोदे, अँड अजित देशपांडे, यांच्यामार्फत संबंधित मंत्रालयास नोटीस पाठवली आहे.
कर्कश हॉर्नपेक्षा कानाला गोड वाटणारे वाद्याचे आवाजा बाबतची ही कल्पना नक्कीच नाविन्यपूर्ण आणि रंजक वाटत असली तरी त्याबददल सर्व बाजूने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. हॉर्न हा रस्त्यावरील इतर वाहने, पायी चालणारी माणसे यांना सावधतेचा इशारा देण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी असतो. हॉर्नचा आवाज हा ऐकण्याची क्षमता कमी-अधिक असणा-या सर्वांनाच ऐकू येईल अशा वारंवारितेच्या ध्वनिलहरींमध्ये असावी. तसेच त्याची तीव्रता देखील विशिष्ट पातळीची असायला हवी.
कोणत्याही बाक्या प्रसंगापासून सावध करणारी प्रणाली म्हणून वापरात असलेला हॉर्न जर संगीतमय असेल तर त्याचा माणसाला सावध करण्याचा मुख्य उददेशच राहणार नाही, असा मुददा नोटीसमध्ये नमूद करण्यात आला आहे. आणि सतत संगीतमय हॉर्न मोठ्या आवाजात सगळीकडून ऐकू येऊ लागल्यास गोंधळ निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याचेही त्यांनी नोटीसमध्ये निदर्शनास आणले आहे.