24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeChiplunचिपळूणमधील खडपोली पूल कोसळला; अलोरे पोलीस ठाणे हद्दीतील पेंडाबे ते खडपोली पर्यायी...

चिपळूणमधील खडपोली पूल कोसळला; अलोरे पोलीस ठाणे हद्दीतील पेंडाबे ते खडपोली पर्यायी मार्गाने वाहतूक

रत्नागिरी, दि. २३ (जिमाका) – पिंपळी नंदिवसे ता. चिपळूण येथील प्रजिमा 23 साखळी क्रमांक 1/00 खडपोली पूल आज रात्री 10.30 वाजता कोसळला. कोणतीही जीवितहानी नाही. पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली असून, अलोरे पोलीस ठाणे हद्दीतील पेंडाबे ते खडपोली जाणाऱ्या पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने एम आय डी सी कडे हस्तांतरित केलेला होता.

पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांनी ५ जुलै रोजी चिपळूण येथील ‘सहकार भवन’मध्ये खडपोली आणि खेर्डी एमआयडीसी नागरिकांच्या समस्यांबाबत विशेषतः पुलांच्या बांधकामाबाबत बैठक घेतली होती. रस्ता, पूल यासाठी २७ कोटी मंजूर केले होते.

पावसाळ्यामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करुन, पावसाळ्यानंतर काम सुरु झाले पाहिजे. खडपोली आणि खेर्डी एमआयडीसीसंदर्भातील समस्या मार्गी लावा, अशा सूचनाही त्यांनी त्यावेळी दिल्या होत्या.

RELATED ARTICLES

Most Popular