26.1 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriकुत्र्याचा पाठलाग करताना बाथरूममध्ये अडकलेल्या बिबट्याला केले जेरबंद

कुत्र्याचा पाठलाग करताना बाथरूममध्ये अडकलेल्या बिबट्याला केले जेरबंद

हा बिबट्या नर जातीचा असून त्याचे वय अंदाजे ८ ते ९ वर्षे आहे.

शिकारीसाठी एका कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या अचानक एका घरातील बाथरूममध्ये अडकला आणि त्यानंतर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. बिबट्याच्या या नाट्यमय अटकेची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी खुर्द गावनवाडीमध्ये हा प्रकार घडला आहे. मौजे कुंभारखणी खुर्द गावनवाडी येथील एका घराच्या बाथरूममध्ये पहाटेच्या सुमारास बिबट्या अडकला असल्याची माहिती मिळताच वनविभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या आणि कुत्र्याची सुरक्षित सुटका केली. ही घटना सोमवारी २५ ऑगस्ट रोजी पहाटे ४.३० वाजता घडली. कुंभारखणी खुर्द येथील रहिवासी ऋषिकेश रामचंद्र भालेकर यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या बाथरूममध्ये एका कुत्र्याचा पाठलाग करणारा बिबट्या अचानक बाथरूममध्ये घुसला. कुत्रा आणि बिबट्या दोघेही आत अडकले. ही बाब भालेकर यांच्या लक्षात येताच त्यांनी कुंभारखाणी खुर्दचे पोलीस पाटील रवींद्र महाडिक यांना कळविले. त्यांनी तातडीने वन विभागाला याची माहिती दिली.

कौशल्याने पिंजरा लावला – माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पाऊले उचलली.. परिक्षेत्रं वन अधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार, परिमंडळ वन अधिकारी न्हानू गावडे आणि इतर कर्मचाऱ्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाहणी केली असता, बाथरूममध्ये कुत्रा आणि बिबट्या दोन्ही अडकले होते. कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून वन विभागाने अत्यंत सावधगिरीने काम केले. त्यांनी बाथरूमच्या दरवाजाच्या वरच्या बाजूला लाकडी फळ्या लावून तो भाग बंद केला आणि बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला.

बिबट्या जेरबंद – वन विभागाच्या टीमच्या प्रयत्नांमुळे काही वेळातच बिबट्या सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद झाला. त्यानंतर, बाथरूममध्ये अडकलेला कुत्राही सुखरूप बाहेर आला. वन विभागाने पकडलेल्या बिबट्याची तपासणी पशुधन विकास अधिकारी श्रेणी १ सूर्यकांत बेलुरे यांनी केली. हा बिबट्या नर जातीचा असून त्याचे वय अंदाजे ८ ते ९ वर्षे आहे. तपासणीनंतर तो पूर्णपणे निरोगी आणि सुस्थितीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर, या बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. या बचावकार्यात परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार, परिमंडळ वन अधिकारी न्हानू गावडे यांच्यासह वनरक्षक आकाश कडूकर, सहयोग कराडे, श्रीमती सुप्रिया काळे, सुरज तेली, श्रीमती शर्वरी कदम, पोलीस पाटील रवींद्र महाडिक आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते. रत्नागिरी-चिपळूण येथील विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती ‘प्रियंका लगड यांच्या म ार्गदर्शनाखाली हे बचावकार्य पूर्ण करण्यात आले. विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारची कोणतीही घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास, वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा.

RELATED ARTICLES

Most Popular