24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriविमा परताव्याचे निकष जाहीर करा - आमदार किरण सामंत

विमा परताव्याचे निकष जाहीर करा – आमदार किरण सामंत

या संबंधित शेतकरी, बागायतदार यांनी निवेदन दिले होते.

हंगाम २०२४-२५चा विमा परतावा, त्याचे निकष विमा कंपनीने जाहीर करून लवकरात लवकर पीकविमा परतावा देण्यात यावा, कोकणातील स्थानिक वातावरणानुसार विम्याचे निकष ठरवण्यात यावेत. याबाबत वरिष्ठांकडून तत्काळ निर्णय घेऊन कारवाई करावी. एप्रिल-मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईचे पंचनामे तत्काळ करावेत, अशा सूचना आमदार किरण सामंत यानी दिल्या. आंबा बागायतदारांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. राजापूर-लांजा तालुक्यातील आंबा बागायतदारांच्या समस्यांसंबंधात राजापूर शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीमध्ये सामंत बोलत होते. ते म्हणाले, यावर्षीचा आंबा हंगाम संपून सुमारे अडीच महिन्याचा कालावधी उलटला तरी बागायतदारांना अद्यापही पीकविमा परतावा मिळालेला नाही. या संबंधित शेतकरी, बागायतदार यांनी निवेदन दिले होते.

या वेळी पीकविमा आकारणी पूर्वीप्रमाणे खराब्यासहित करणे शक्य नसल्याने सातबारावरील खराबा क्षेत्राचे वरकसमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी तहसीलदार व भूमी अभिलेखमार्फत उपाययोजना करण्यात याव्यात, पीकविमा कालावधी १ ऑक्टोबर ते ३१ मे असा असावा, कीटकनाशके, खते आदींच्या किमतीवर नियंत्रण असावे, थ्रीप्स, तुडतुडे आदी रोगांवर परिणामकारक प्रभावी कीटकनाशकांचा वापर करण्याबाबत संशोधन व्हावे, शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर मेळाव्यांच्या आयोजनासह शेतकरी-शास्त्रज्ञ मंच स्थापना करावी, वानर-माकडांच्या त्रासावर उपाययोजना, रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यांचा एआय तंत्रज्ञानामध्ये समावेश व्हावा, शेतकऱ्यांसाठी प्रत्येक तालुक्यामध्ये सुसज्ज प्रयोगशाळा असावी, सर्व शेतकरी कर्जदारांना सरसकट कर्जमाफी मिळावी, आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

बिनव्याजी कर्जाची मर्यादा १० लाख करा – बागायतदार, शेतकरी यांना बँकांमार्फत तीन लाखापर्यंत देण्यात येणाऱ्या बिनव्याजी कर्जाची मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत करण्यात यावी. सध्या असलेली प्रतिझाड २ हजार २०० रुपये ही मर्यादा वाढवून ती जेवढी जास्तीत जास्त करता येईल त्या बाबतीत कृषी विभाग, कृषी विद्यापीठ प्रतिनिधी यांनी त्याबाबत नव्याने निकष ठरवावेत, अशी सूचना आमदार किरण सामंत यांनी बँक प्रतिनिधींसह कृषी विभाग, कृषी विद्यापीठ यांना दिली.

RELATED ARTICLES

Most Popular