24.9 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeChiplunचिपळूण पालिकेच्या इमारतीचा वापर थांबवा

चिपळूण पालिकेच्या इमारतीचा वापर थांबवा

मुसळधार पावसात हे पाणी स्लॅबमधून झिरपून लाकडी जिन्यावर येते.

पालिकेची मुख्य इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक झाल्यामुळे तिचा वापर तत्काळ बंद करून कार्यालयीन विभाग अन्यत्र हलवावेत, अशी मागणी माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. चिपळूण पालिकेच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १३ ऑक्टोबर २०२१ रोजीच देण्यात आले होते, मात्र पालिका प्रशासनाने अद्याप ऑडिटचा अहवाल सादर केलेला नाही. दरम्यान, मुख्य इमारतीलगतची १९८० च्या दशकातील जोड इमारत अधिक धोकादायक ठरल्याने ती पाडण्याची प्रक्रिया सुरू आहे. तथापि, मूळ मुख्य इमारतही आता अत्यंत कमकुवत, तडे गेलेली आणि पावसामुळे गळक्या अवस्थेत असूनही त्यातच कार्यालयीन कामकाज सुरू असल्याने मोठा अनर्थ होऊ शकतो, असा इशारा श्री. मुकादम यांनी दिला आहे.  श्री. मुकादम यांनी पालिका प्रशासनाचा अकार्यक्षमपणा आणि दुर्लक्ष करत जिल्हाधिकाऱ्यांना या धोकादायक इमारतीचा वापर तत्काळ बंद करून तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे. या निवेदनाची प्रत पालकमंत्री उदय सामंत व पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनाही पाठवली आहे.

जीवित, वित्तहानीची शक्यता – सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात छताचे प्लास्टर अनेकदा कोसळले आहे. जिने आणि भिंती सतत ओलसर राहतात. अशा परिस्थितीत शेकडो अधिकारी-कर्मचारी दररोज या इमारतीत कार्यरत असणे म्हणजे आत्मघातकी ठरत आहे. सौम्य भूकंप किंवा नैसर्गिक आपत्ती झाली तरी मोठ्या प्रमाणावर प्राण व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही इनायत मुकादम यांनी निवेदनात नमूद केले आहे.

लाकडी जिन्यावर प्लास्टिक – पालिकेच्या मुख्य इमारतीला गळती लागली आहे. त्यामुळे मुसळधार पावसात हे पाणी स्लॅबमधून झिरपून लाकडी जिन्यावर येते. पाण्यात जिनां खराब होण्याची शक्यता असल्याने त्यावर तात्पुरती उपाययोजना म्हणून प्लास्टिक टाकण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular