25.5 C
Ratnagiri
Saturday, September 6, 2025

एसटी प्रशासनाकडून लोकेशन अॅप’ची केवळ घोषणा

लालपरी'चे अचूक ठिकाण मोबाईलवर दिसेल, बस वेळेवर...

पीकविमा योजनेत खेड-दापोली आघाडीवर…

प्रधानमंत्री पीकविमा योजना यंदा नव्या स्वरूपात रत्नागिरी...

परतीचा प्रवास ठरला कोंडीचा… वाहनांच्या रांगा

गौरी-गणपती विसर्जनानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास बुधवारपासून सुरू...
HomeMaharashtraदिवाळीआधीच गिफ्ट! जीएसटी कपातीमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा

दिवाळीआधीच गिफ्ट! जीएसटी कपातीमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा

आता केवळ ५% आणि १८% जीएसटी आकारला जाईल.

जीएसटी कॉन्सलिने (परिषद) एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून सेवा आणि वस्तू करामध्ये मोठे बदल करत ग्राहकांना दिलासा दिला आहे. जीएसटी परिषदेने १२% आणि २८% हे दोन स्लॅब रद्द केले असून केवळ ५% आणि १८% हे दोनच स्लॅब आता असणार आहेत. कररचनेत केलेल्या या बदलामुळे दैनंदिन वापरातील अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. त्याचप्रमाणे औषधे, शालेय शिक्षणासाठी लागणारे साहित्य, बिस्किटे, केक, पेस्ट्री, सुकामेवा, काजू, बदाम, पिस्ता, नारळपाणी आदींसह शेतकऱ्यांसाठी लागणारी यंत्रसामुग्री आणि गाड्या स्वस्त होणार आहेत. येत्या २२ सप्टेंबरपासून ही नवी कररचना अमलात येत असल्यामुळे दिवाळीआधीच ग्राहकांना गिफ्ट मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. जीएसटी कररचनेत अनेक बदल करण्याची तयारी गेले अनेक दिवस सुरु होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरून दिलेल्या आपल्या भाषणात येत्या दिवाळीत सर्वसामान्यांना लागणाऱ्या अनेक वस्तू स्वस्त होतील असे जाहीर केले होते. तेव्हापासून या दिवाळी गिफ्टची चर्चा सुरू होती. दिवाळीआधीच जीएसटी कॉन्सिलने कररचनेत बदल केला असून बुधवार आणि गुरुवार असे २ दिवस झालेल्या याबैठकीत पूर्वीच्या रचनेतील ५%, १२%, १८% आणि २८% या चार दरांपैकी केवळ ५% आणि १८% असे दोनच दर आता अंमलात राहणार आहेत. यामुळे अनेक वस्तू ५% कराच्या कक्षेत येत असल्याने किंमती कमी होणार आहेत.

लक्झरी सेवांवर ४०% कर – दोन दिवसांच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितले की, १२% आणि २८% हे दोन स्लॅब रद्द झाले आहेत. आता केवळ ५% आणि १८% जीएसटी आकारला जाईल. मात्र त्याचबरोबर ऐशोआराम सेवा म्हणजेच लक्झरी सर्व्हिस आणि आरोग्यात हानीकारक वस्तूंसाठी ४०% करदर निश्चित करण्यात आला आहे. सर्व राज्यांच्या सहमतीने हा निर्णय एकमताने कॉन्सिलने घेतला असून पंतप्रधानांच्या आश्वासनांची दिवाळीआधीच पूर्तता करीत आहोत. येत्या २२ सप्टेंबरपासून ही नवीन करप्रणाली लागू होणार आहे.

काही वस्तू करमुक्त – निर्मला सितारमण यांनी सांगितले की, याचबरोबर काही वस्तू करमुक्त होतील म्हणजेच त्यांच्यावर ०% कर असेल अशा वस्तूंमध्ये दूध, पनीर, पिझ्झा, ब्रेक, बटर, रोठी, पराठा आदीवस्तूंसाठी कोणताही जीएसटी असणार नाही.

५% करप्रणालीतील वस्तू – या नवीन करपद्धतीनुसार ५% जीएसटी आकारल्या जाणाऱ्या बहुतांश वस्तू असतील. त्यामध्ये सुकामेवा, काजू, बदाम, खजूर, पिस्ता, लोणी, पॅक्ड नारळपाणी, नुडल्स, पॉपकोन, बिस्किटे, केक, पेस्ट्री, नमकीन आदीवस्तूंचा समावेश असेल.

शेतकऱ्यांना फायदा – या नवीन कररचनेमुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतीसाठी अनेक उपकरणे, ट्रक्टर, पंप, चामड्याच्या वस्तू यांचे कर १२% वरून ५% करण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रातील अनेक सुविधांवर कर कमी करण्यात आला आहे. त्यामध्ये कॅन्सरवरील औषधे, शस्त्रक्रियेसाठी लागणारी उपकरणे आदी जीएसटी मुक्त असतील. आरोग्य विमा आणि जीवन विमा पॉलिसीवर कर सवलत देण्यात येणार आहे.

कपडे स्वस्त – कपडे, शुज यांच्यावर याआधी १२% जीएसटी होता तो ५% वर आला आहे. घरगुती उपकरणेही स्वस्त होणार आहेत. त्यामध्ये एसी, वॉशिंग मशीन, ३८ इंचापेक्षा मोठे टिव्ही, छोट्या कार यांच्यावरील कर २८% वरून १८% वर आला आहे. कृषी, आरोग्य, विमा क्षेत्रासह शैक्षणिक क्षेत्रासाठीही या नव्या करसवलतीमुळे स्वस्ताहीची लाट येणार आहे. दिवाळीआधीच सरकारने जनतेला हे गिफ्ट दिले असून अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन केले आहे. जीएसटीच्या नव्या कररचनेमुळे सर्वसामान्य घरगुती वस्तूंच्या किंमती कमी होणार आहेत. महागाईने पोळलेल्या जनतेला हा एक दिलासा मानला जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular