25.9 C
Ratnagiri
Sunday, September 7, 2025

जागा खरेदीसाठीही मिळणार घरकुल योजनेतंर्गत आर्थिक मदत

ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांकडे स्वतःची जमीन नसल्यामुळे...

रत्नागिरी पॅसेंजरसाठी २ ऑक्टो. ला जल फाऊंडेशनचे लाक्षणिक उपोषण

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांकडे मध्य...
HomeKhedपेट्रोल पंपाच्या कंपाऊंडची संरक्षक भिंत कोसळली; सीएनजीचा पुरवठा बंद

पेट्रोल पंपाच्या कंपाऊंडची संरक्षक भिंत कोसळली; सीएनजीचा पुरवठा बंद

वाहनधारकांसह गणेशोत्सवासाठी आलेल्या गणेशभक्तांचे प्रचंड हाल झाले आहेत.

मंडणगड मधील एचपीसीएल कंपनीच्या नोबेल ऑटो पेट्रोल पंपाची संरक्षक भिंत कोसळल्याने पंप व्यवस्थापकाने पंपावरील सीएनजी गॅसचा पुरवठा किमान दहा ते बारा दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात सीएनजीचा पुरवठा बंद झाल्यानें स्थानिक सीएनजी वाहनधारकांसह गणेशोत्सवासाठी आलेल्या गणेशभक्तांचे प्रचंड हाल झाले आहेत. शहरातील पालवणी फाटा येथील नोबेल ऑटो पेट्रोल पंपाच्या कंपाऊंडसाठी घातलेली संरक्षक भिंत चार दिवसांपूर्वी पावसामुळे कोसळली. या संरक्षक भिंतीला लागुनच असलेला मोठा विद्युत जनरेटर व सीएनजी गॅस टाक्या आहेत, त्यामुळे संरक्षक भिंतीचे नव्याने बांधकाम करणे अपरिहार्य आहे. बांधकामाकडे दुर्लक्ष केल्यास पंपावरील उपकरणांचे नुकसान होऊ शकते. यासाठी पेट्रोल पंप व्यवस्थापकाने तातडीने नवीन काँक्रीटची संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्याचे काम हाती घेतले आहे.

सध्या हे काम प्रगतीपथावर असून संरक्षक भिंत बांधकाम पूर्ण होण्याकरिता दहा ते बारा दिवसांचा कालावधी लागणार असल्याने सीएनजीचा पुरवठा याकालावधी दरम्यान बंद करण्यात येत असल्याची माहिती पेट्रोल पंप व्यवस्थापक यांनी दिली. दरम्यान तालुक्यात एकमेव सीएनजीचा पंप असल्याने सीएनजी वाहनधारकांचे हाल होत असून त्यांना पर्याय म्हणून चाळीस किमी अंतरावरील खेड, दापोली, महाड, गोरेगाव येथील सीएनजी पंपावर जावे लागत आहे. एचपीसीएल कंपनीने सीएनजीचा पुरवठा लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी स्थानिक सीएनजी गॅस वाहनधारकांकडून केले जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular