26 C
Ratnagiri
Saturday, November 22, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeSindhudurgकरूळ घाट दुरुस्ती, त्या' सहा दरडी पाडण्यास सुरुवात

करूळ घाट दुरुस्ती, त्या’ सहा दरडी पाडण्यास सुरुवात

दगड, माती पाडण्याचा पहिला प्रयोग करूळ घाटात आज करण्यात आला.

करूळ घाटात कोसळलेली दरड हटविण्यात आली असून, तज्ज्ञांच्या पथकाने धोकादायक ठरविलेल्या घाटातील सहा ठिकाणच्या दरडी पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. घाटात दरडींवर चढून दगड, माती पाडण्याचे काम प्रथमच केले जात आहे. साधारणपणे पंधरा ते वीस कामगार हे काम करीत आहेत. करूळ घाटात गुरुवारी (ता. ४) यू आकाराच्या वळणावर दरड कोसळली. महाकाय दगड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर दोन जेसीबी आणि ब्रेकरच्या मदतीने दरड हटविण्यास सुरुवात केली. दोन दिवसांनंतरही दरड हटविण्यात महामार्ग प्रधिकरणला यश आले नव्हते. दरम्यान, घाट वाहतुकीच्या दृष्टीने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी हा घाटमार्ग १२ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाने घाटरस्त्याची पाहणी करण्यासाठी तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण केले. हे पथक ५ सप्टेंबरला घाटात दाखल झाले. त्यांनी दिवसभर घाटरस्त्यांची पाहणी केली. ज्या ठिकाणी दरड कोसळली होती, तेथील सर्वेक्षण केले.

तज्ज्ञांच्या पथकाने सर्वेक्षणाअंती घाटरस्त्यांतील सहा ठिकाणे धोकादायक असल्याचे स्पष्ट केले. याशिवाय कोणत्याही कोसळतील, असे दगड, पाडण्याचे उपाय सुचविले. त्यानुसार क्षणी मुरुम आज सकाळपासून परशुराम घाटात जोखमीचे काम करणारे दहा ते पंधरा कामगार करुळ घाटात दाखल झाले. त्यांनी करुळ घाटातील धोकादायक असलेल्या ठिकाणी कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या ठिकाणी चढून दरडी, माती पाडण्याच्या कामाला सुरुवात केली. डोंगरावर चढून धोकादायक दरडी पाडण्यात येत आहेत. आज दिवसभर हे काम सुरू होते. डोंगरात सुरक्षित ठिकाणी दोरखंड बांधून हे काम केले जात आहे. दरम्यान, पुढील चार-पाच दिवस हे काम चालण्याची शक्यता आहे.

करूळ घाटात प्रथमच प्रयोग – पडलेल्या दरडी हटविणे आणि वाहतूक सुरू करणे इतकेच काम यापूर्वी बांधकाम विभाग आणि आताचे महामार्ग प्रधिकरण करीत होते. परंतु, प्रथमच घाटातील धोकादायक ठिकाणचे दगड, माती पाडण्याचा पहिला प्रयोग करूळ घाटात आज करण्यात आला. याचा किती उपयोग होतो, हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular