गेले दोन आठवडे लोटे औद्योगिक वसाहतीता करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती सरपल्याची ओरड सुरू होती. गणेशोत्सव असत्याचे करण देत दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या एमआयडीसीमुळे स्थानिक नागरिकांना सोमवारी रात्री मोठा फटका बसला. फुरशी तिठा येथे गळतीच्या ठिकाणी अंतवाहिनी फुटल्याने लगतच्या दोन दुकानांना सुमारे नऊ लाखांचा फटका बसला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगबा फुरशी तिठा येथे एमआयडीसीची मुख्य बेलवाहिनी फुटल्याने परिसरातील दुकानदारांसह नागरिकांची दाणादाण दहाली. जलवाहिनी फुटल्याने मोठे करंजे उडत होते. त्यामुळे हा परिसर अक्षरशः पाण्याने वेढला गेला होता. लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात होते तर परिसरातील दुकानांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. या प्रकारामुळे दोन दुकानांतील साहित्य भिजून मोठे नुकसान झाले.
यामध्ये नरेंद्र नथुराम माळी यांचे ६ लाख ६५ हजार तर राकेश प्रदीप गडदे यांचे २ लाख ३९ हजाराचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के व तलाठी विजया मेटकर यांनी पंचनामा केला तसेच एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या वेळी काही ग्रामस्थांनी किरकोळ गळती असताना दुर्लक्ष केल्यानेच ही भीषण घटना घडल्याचे सुनावले. या घटनेमुळे एमआयडीसीच्या जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे लोटे औद्योगिक वसाहतीसह परिसरातील १२ गावांचा पाणीपुरवठा देखील खंडित झाला आहे. या पाश्र्वभूमीवर मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे. मंगळवारी सकाळपासूनच ब्रेकरच्या सहाय्याने काँक्रिट तोडून गळतीच्या ठिकाणी नवीन पाई टाकण्याचे काम सुरू होते. बुधवार सकाळपर्यंत हे काम पूर्ण होईल तोपची या जलवाहिनीतून पाणीपुरवठा राहणार असल्याचे अधिकाऱ्या सांगितले.

