मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी मराठा म्हणून दाखले देण्याच्या शासन अध्यादेशाच्या निषेधार्थ गुहागर तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्यावतीने सोमवारी १५ सप्टेंबर रोजी हजारोंच्या संख्येने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट कुणबी मराठा म्हणून दाखले देण्याचा शासनाने अध्यादेश काढलेला आहे हा अध्यादेश जरी कुणबी समाजापुरता मर्यादित असला तरी त्याचा विपरीत परिणाम भविष्यात ओबीसीतील सर्व घटकांवर होणार आहे असे ओबीसी समाजाचे म्हणणे आहे. गुहागर तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीने गेली ४ ते ५ वर्ष ओबीसींच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सतत आपला लढा चालू ठेवला आहे. महाराष्ट्र शासनाच्या या अध्यादेशाविरोधात गुहागर तालुक्यातील कुणबी समाज आणि त्यांच्या बरोबरीने ओबीसीतील सर्व समाज घटकांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते १५ सप्टेंबर २०२५ रोजी ११ वा. गुहागर तालुका तहसील कार्यालय येथे येऊन तहसीलदारांना याबाबतचे निवेदन सादर करणार आहेत.
सकाळी १० वाजता गुहागर नगरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सर्व ओबीसी बंधू-भगिनी गुहागर तहसीलदार कार्यालयाकडे कूच करणार आहेत. या सर्व आंदोलनाच्या पूर्वतयारीची बैठक गुहागर बाजार हॉल शृंगार तळी येथे ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी माजी सभापती राजेश बेंडल. रामचंद्र हुमणे गुरुजी, ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे सेक्रेटरी निलेश सुर्वे, माजी जिल्हा परिषदेच्या सदस्या नेत्राताई ठाकूर, पद्माकर आरेकर, प्रदीप बेंडल, गुहागर तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष नवनीत ठाकूर, नाभिक सम ाजाचे अध्यक्ष संजय पवार, विश्वकर्मा सुतार समाजाचे अध्यक्ष धामणस्कर गुरुजी, वैश्य समाजाचे अध्यक्ष अजित भाऊ बेलवलकर, विजय मसुरकर, रामाणे गुरुजी, रविंद्र कुळे गुरुजी, प्रमेय आर्यमाने, समीर डिंगणकर आदीसह गुहागर तालुका ओबीसी समाजातील सर्व प्रतिनिधी, न्याती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समस्त ओबीसी समाजाच्या पुढच्या पिढीच्या उज्वला भविष्या भवितव्यासाठी उभारण्यात येणा-या लक्ष्यामध्ये गुहागर तालुक्यातील सर्व ओबीसी बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने सोमवार दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक ११ वा. गुहागर नगरीतील छत्रपती शिवाजी महाराज बौक येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाते आणि सरचिटणीस निलेश सुर्वे यांनी केले आहे.

