26.4 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeRajapurमुंबईत आझाद मैदानावर होणाऱ्या ओबीसींच्या आंदोलनात ताकद दाखवण्याचा कुणबी संघाचा निर्धार

मुंबईत आझाद मैदानावर होणाऱ्या ओबीसींच्या आंदोलनात ताकद दाखवण्याचा कुणबी संघाचा निर्धार

अशी गर्जना कुणबी समाजोन्नती संघ मुंबईचे अध्यक्ष अनिल नवगणे यांनी केली.

कुणबी-ओबीसी असा कोणताही आमच्यात भेदभाव नाही. आम्ही सर्व एकच अर्थात ओबीसी आहोत. ९ ऑक्टोबरला मुंबई येथील आझाद मैदानावर ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन होणार आहे. त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होवून ‘मुंबईत चक्का जाम करून ओबीसीसह कुणबी बांधवांची ताकत शासनाला दाखवूया.’ अशी गर्जना कुणबी समाजोन्नती संघ मुंबईचे अध्यक्ष अनिल नवगणे यांनी केली. यावेळी बोलताना त्यांनी ‘आमचा कोणाला विरोध नाही. आम्ही अधिकही मागत नाही. मात्र जे आमचं आहे, त्यामध्ये कोणी घुसखोरी करीत असेल तर ती मात्र आम्ही कधीही खपवून घेणार नाही, असा सज्जड इशाराही त्यांनी शासनकर्त्यांना दिला. ओबीसी आरक्षण बचावासाठी एकसंघतेची वज्रमूठ उभारण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. या मेळाव्याला दणकेबाज उपस्थिती होती. कुणबी समाजोत्रती संघातर्फे पुढील महिन्यात मुंबई येथे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन छेडले जाणार आहे. त्याअनुषंगाने कुणबी सम ाज बांधवांशी संवाद साधण्यासाठी शुक्रवारी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे कुणबी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्यात ओबीसी समाजातील अन्य ज्ञातीतील बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात नवगणे यांनी मार्गदर्शन केले. कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण शाखा राजापूरचे अध्यक्ष दीपक नागले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याला कुणबी संघाचे अरविंद डाफळे, राजापूर शाखेचे अध्यक्ष शिवाजी तेरवणकर, ओबीसी जनम ोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, ओबीसी जनमोर्चाचे राजापूरचे अध्यक्ष महेश शिवलकर, अॅड. शशिकांत सुतार, प्रकाश मांडवकर, रविंद्र नागरेकर, मधुकर तोरस्कर, मानसी दिवटे, सत्यवान कणेरी, चंद्रकांत जानस्कर, अॅड. महेंद्र मांडवकर, नरेश शेलार, मारूतीराव खेडस्कर यांसह कुणबी संघाचे पदाधिकारी आणि ओबीसी समाजनेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष बावकर यांनी बोलताना ओबीसी आरक्षण आणि त्याबाबत शासन निर्णय याचा आढावा घेताना कुणबी नावाखाली घुसण्याचा आणि त्यातून ओबीसी आरक्षण संपविण्याचे षडयंत्र सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट केले. अॅड. शशिकांत सुतार यांनी ओबीसी आरक्षण, त्यासंबंधित कायदेशीर बाबी सविस्तरपणे मांडताना ओबीसी आरक्षण बचावाचे महत्व मार्गदर्शनाद्वारे अधोरेखित केले. यावेळी प्रकाश मांडवकर, श्रीकृष्ण वणे, शिवाजी तेरवणकर, अॅड. महेंद्र मांडवकर आदींनीही मार्गदर्शन केले. तर दीपक नागले यांनी प्रस्तावना करताना त्याद्वारे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. या मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद होता. प्रारंभी महापुरूष तसेच कुणबी समाजातील दिवंगत नेत्यांना अभिवादन करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular