25.3 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriसंगमेश्वर-पाटण घाटमार्गाला प्राधान्याने गती देण्याच्या मुख्य सचिव मनीषा पाटणकर - म्हैसकर

संगमेश्वर-पाटण घाटमार्गाला प्राधान्याने गती देण्याच्या मुख्य सचिव मनीषा पाटणकर – म्हैसकर

हा रस्ता पुर्ण झाल्याने वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे.

संगमेश्वर ते पाटण या ४६ कि.मी मधील लांबीच्या सव्र्व्हेक्षणाचे काम मोनार्च सव्र्व्हेयर्स अॅन्ड इंजिनीअरींग कंसल्टंट लि. या कंपनीला देण्यात “आले आहे. घाटमार्ग कामाचा डीपीआर शासनाला सादर करण्यांची जबाबदारी या कंपनीकडे देण्यात आली आहे. विहीत मुदतीत या कंपनीने डीपीआर शासनाला सादर करुन प्रशासकीय मान्यता प्रक्रीया पार पाडत या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी अशी विनंती यावेळी संतोष येडगे यांनी केलीः संगमेश्वर ते चाफेर (पाटण) हा एकूण ४६.६०० कि.मी. चा रस्ता आहे यापैकी २६.६०० कि.मी एकेरी रस्ता तयार असून फक्त २० कि.मी. रस्ता तयार करावा लागणार आहे. रत्नागिरी जिल्हा हद्दीतील ५.५०० कि.मी तर सातारा जिल्हा हद्दीतील १४.६०० कि.मी अंतरामधील रस्ता शिल्लक आहे.

२०.१०० कि. मी एकेरी रस्ता पुर्ण केल्यास या मार्गावरील वाहतूक सुरु होणार आहे. संगमेश्वर -पाटण घाटमार्ग डीपीआर साठी महाविकास आघाडी सरकार मधील तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी २०१८ या अर्थसंकल्पीय वर्षात ५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. हा रस्ता पुर्ण झाल्याने वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे. संगमेश्वर- पाटण घाटमार्ग कामाचे भूमिपूजन १९९९ मधील युती सरकारच्या काळात झाले होते. सध्या युती सरकार सत्तेत आहे आणि याच सरकारच्या माध्यमातून हा प्रकल्प पुर्ण व्हावा अशी जनतेची अपेक्षा आहे. या घाटमार्गासाठी दोन्ही जिल्ह्यातील ४ लाखांपेक्षा अधिक ‘जनता आग्रही आहे.

RELATED ARTICLES

Most Popular