सामाजिक राजकीय जीवनातून निवृत्त कधी व्हायचं हे आपण ठरवत नाही… आपण ठरवलं तरी लोकांची भूमिका ही सुद्धा महत्वाची असते… निवृत्ती कधी घ्यायची हे जनतेने, कार्यकर्त्यांनी ठरवायचं असतं…. जनतेचा कार्यकर्त्यांचा जर आग्रह झाला, तर मी पुन्हा निवडणूक लढविन… असे विधान माजी आ. रेमशभाई कदम यांनी करताच उपस्थितीतांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तर कार्यकर्त्यांकडून सातत्याने आग्रह होत असल्याने रमेशभाई ‘निवडणुकीच्या मैदानात उमेदवार म्हणून उतरणार हे आता निश्चित झाल्याने अनेक इच्छुक आता व्हेंटिलेटरवर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. चिपळूण नगरपरिषद व पूज्य गांधी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गंधारेश्वर येथे महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी आ. रेमशभाई कदम बोलत होते. यावेळी चिपळूण राष्ट्रवादीचे नेते जयंद्रथ खताते, सतीशअप्पा. खेडेकर आदी मान्यवर व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी रमेशभाई कदम यांनी नगरपालिकेच्या कामाचे कौतुक केले.
जणू बॉम्ब फोडला! – नगरपालिका निवडणूका तोंडावर आल्या आहेत. नगराध्यक्षपदाचे आरक्षण अजून जाहीर होणार आहे, मात्र तत्पूर्वीच रमेशभाई कदम यांनी शाब्दिक बॉम्ब टाकून एकच खळबळ उडवून दिली आहे. चिपळूण शहरात माजी आ. रमेशभाई कदम यांचे आजही मोठे वर्चस्व आहे. त्यांनी टाकलेल्या शाब्दिक बॉम्बने अनेक उमेदवार उभे राहण्यापूर्वीच घायाळ झाल्याचे म्हटले जात असून आजच्या शाब्दिक बॉम्बने शहरात मात्र एकच खळबळ उडवून दिली आहे.
गेम चेंजर – माजी आ. रमेशभाई कदम यांनी अनेकवेळा एकहाती सत्ता मिळवली आहे. अनेकवेळा मोठा संघर्ष करावा लागला होता. मात्र अशाही स्थितीत मागे न हटता त्यांनी निवडणुकीचा गेम एक हाती फिरवून सत्ता घेतली आहे. गेमचेंजर म्हणून ओळख असणाऱ्या रमेशभाई कदम जर मैदानात आले, तर भल्या भल्यांना ही निवडणूक अवघड जाईल असेच म्हटले जात असून रमेशभाई कदम यांनी तशा दृष्टीने राजकीय खेळी ही खेळण्यास सुरवात केल्याचे म्हटले जात आहे.
एकमेव नगराध्यक्ष – चिपळूण शहरातील जनतेची पूर्ती नस ओळखलेल्या रमेशभाई कदम यांना शहरातील कोणानकोनाज्ञात आहे. तब्बल ९ वर्ष त्यांनी नगराध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यामुळे शहरातील समस्या, प्रशासनाचा कारभार आणि जनेतला अपेक्षित असलेला विकास याची मांडणीच त्यांच्याकडे आहे.
वक्तव्याची जोरदार चर्चा – रमेशभाई कंदम यांनी आज उभे राहण्यासंदर्भात वक्तव्य करताच याची जोरदार चर्चा शहरात वाऱ्याच्या वेगाने सुरू झाली. आता फक्त आरक्षण काय पडते, याची उत्सुकता आहे आणि तसे घडले तर मग याच विचाराने अनेक इच्छुक उमेदवारांमध्ये हलचल निर्माण झाली आहे. तर रमेशभाई कदम यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चना मात्र जोरदार उधाण आले आहे.