26.4 C
Ratnagiri
Saturday, February 14, 2026

संगमेश्वर तालुक्यात जंगलतोड कोसुंबमध्ये लाकडाचा साठा

गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात विनापरवाना जंगलतोड...

काजिर्डा घाटरस्ता, सर्वेक्षणाला चालना एक कोटीची तरतूद

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह घाटमाथ्यावरील कोल्हापूर जिल्हा...

कोकण कन्या पाठोपाठ मांडवी एक्सप्रेसही खोळंबल्याने दादर स्थानकावर प्रवाशांचा संताप

मुंबईच्या दिशेने येणारी 'कोकण कन्या एक्सप्रेस' मार्गात...
HomeRatnagiriपळवून आणलेल्या मुलीला बुरंबाडमध्ये डांबले प्रसंगावधानाने मुलगी सुखरूप

पळवून आणलेल्या मुलीला बुरंबाडमध्ये डांबले प्रसंगावधानाने मुलगी सुखरूप

अपहरण करणाऱ्या तरूणाला ताब्यात घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

रिक्षा चालकाच्या प्रसंगसावधानतेमुळे व माखजन पोलिसांच्या तत्परतेमुळे कर्नाटकातून पळवून आणलेल्या एका मुलीला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात यश आले. याप्रकरणी कागल (जि. कोल्हापूर) पोलिसांनी बुरंबाड (ता. संगमेश्वर) येथील तरुणावर कारवाई केली आहे. ‘पोलीसांनी याबाबत पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, कोंडीवरे येथील रिक्षाचालक इरफान खान हे रिक्षा घेऊन आरवलीकडे चालले होते. याच दरम्यान एक मुलगी आरवली बाजूच्या रस्त्याने धावत चालली होती. इरफान खान यांनी आपली रिक्षा थांबवून तिला हटकले असता आपल्याला कोणीतरी पळवून आणलेले आहे असे सांगून ती रडू लागली. ही बाब रिक्षाचालक इरफान खान यांनी लागलीच माखजन पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी यांना कळविली. पोलिसांनी तत्परता दाखवून या मुलीला ताब्यात घेतले व कर्नाटकातील पोलिसांशी संपर्क साधला.

वर्गमित्राने पळवले – याबाबत पोलिसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, या मुलीची चौकशी केली असता या मुलीने आपले नाव सांगून आपण आदर्श नगर निपाणी, जि. बेळगाव कर्नाटक येथील मूळ निवासी असल्याचे सांगितले. तसेच तिने आपण इयत्ता ११ वी कॉमर्स मध्ये कागल (जि. कोल्हापूर) मधील कॉलेजमध्ये शिकत असल्याचीही माहिती दिली. दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी कॉलेजला आले असता कागल बस स्टँडवर आपल्या वर्गमित्राने मला हत्याराचा धाक दाखवून पळविले. तेथून मला एसटी बसने पंढरपूर येथे घेऊन गेला. माझ्याकडील मोबाईल फोडून सीम कार्ड तोडून टाकले. त्याने शस्त्राचा धाक दाखवून प्रथम पंढरपूर येथे, त्यानंतर मुंबईतील दादर येथे आणि तेथून परत पंढरपूर, कराड असे फिरवत ४ दिवसांपूर्वी संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाडमध्ये आणले, अशी माहिती या मुलीने पोलीसांना दिली. यादरम्यान आपल्या या वर्गमित्राने आपल्यावर बळजबरी केली असून ठार मारण्याची धमकी देत घरामध्ये कोंडून ठेवल्याची माहिती तिने पोलीसांना दिली.

दुपारी पळाली – १ ऑक्टोबर २०२५ रोजी तो मुलगा आणि त्याची आई कोल्हापूर येथे निघून गेली होती. त्यामुळे शुक्रवारी संबंधित आरोपीची आजी दुपारच्यावेळी झोपलेली असताना संधीचा फायदा घेत ही तरुणी घराचा म ागील दरवाजा उघडून बाहेर पळून गेली. ही मुलगी आरवलीकडे जात असताना रिक्षाचालक इरफान खान यांनी पाहिले व पोलिसांच्या ताब्यात दिले.

नातेवाईकांशी संपर्क – माखजन पोलिसांनी इचलकरंजी येथील तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही सदर मुलगी नापत्ता झाल्याबाबत निपाणी शहर पोलीस ठाणे कर्नाटक येथे तक्रार दिली असून त्याअन्वये बी. एन. एस. १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे, असे सांगितले. संगमेश्वर पोलिसांनी निपाणी पोलिसांशी संपर्क साधल्यावर निपाणी पोलिसांनी संगमेश्वर येथे येऊन मुलीला ताब्यात घेतले असून अपहरण करणाऱ्या तरूणाला ताब्यात घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular