मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ धडकणार आहे. भारतीय हवामान विभागाने चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा दिला आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना अधिक सतर्क राहण्याचं सांगण्यात आलं आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवरील समुद्राची स्थिती अत्यंत धोकादायक राहील. समुद्रात चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता असल्याने मच्छिम ारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. बोटींना बंदरातच थांबण्याचं सांगितलं असून जे समुद्रात आहेत त्यांना तात्काळ मागे परत येण्याचं सांगितलं आहे. तसंच किनारपट्टीवरील रहिवाशांना सावधानेचा इशारा दिला आहे. राज्याच्या काही भागात पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. महाराष्ट्रात ३ ते ७ ऑक्टोबरदरम्यान चक्रीवादळाचा इशारा जाहीर करण्यात आला आहे. आयएमडीं ट्रॉपिकल सायक्लोन अॅडव्हायजरी क्र. ०३ नुसार ‘शक्ती’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना धोका निर्माण होऊ शकतो.
३ ते ७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीलगतच्या भागांवर या वादळाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता आहे. किनारपट्टी भागात समुद्र खवळलेला राहणार असल्याने मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर ४५ ते ५५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. झंझावाती वारे ६५ किमी प्रतितास वेगाने वाहू शकतात. चक्रीवादळाची तीव्रता वाढल्यास या वाऱ्यांचा वेग आणखी वाढू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर समुद्र अतिशय खवळलेला राहील. त्यामुळे मच्छिमारांनी या कालावधीत समुद्रात न जाण्याचा स्पृष्ट इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे राज्यातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.