24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeMaharashtraयंदा परीक्षा लवकर होणार १० वी, १२ वीच्या तारखा जाहीर

यंदा परीक्षा लवकर होणार १० वी, १२ वीच्या तारखा जाहीर

अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा २ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत.

एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे दहावी आणि बोर्डाच्या परीक्षांच्या बारावी करण्यात आल्या आहेत. बारावी बोर्ड परीक्षा १० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. तर दहावी बोर्ड परीक्षा २० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे. यंदाच्या वर्षी सुद्धा दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा दोन आठवडे आधी घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. कारण, १२ वी बोर्ड परीक्षा ही फेब्रुवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यात असते, तर दहावीची परीक्षा ही मार्च महिन्यात सुरू असते. मात्र, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र १२ वी आणि म ाध्यमिक शालान्त प्रमाणपत्र १०वीच्या फेब्रु-मार्च २०२६ च्या परीक्षांच्या तारखांबाबत शासनाने परिपत्रक जारी केलं असून परीक्षा लवकर होत आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागीय मंडळामार्फत आगामी फेब्रुवारी-मार्च २०२६ मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र १२ वी आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र १० वी परीक्षेच्या लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा तारखांना आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, १२ वीची लेखी परीक्षा मंगळवार १० फेब्रुवारी २०२६ ते बुधवार १८ मार्च २०२६ (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाईन परीक्षेसह) होणार आहे. तर, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र १० वीची परीक्षा कालावधी शुकवार २० फेब्रुवारी २०२६ ते बुधवार १८ मार्च २०२६ रोजी घेण्यात येणार आहेत. दरम्यान शासनाच्या परिपत्रकानुसार १२ वी बोर्डाच्या प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षा या २३ जानेवारी २०२६ ते ९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणार आहेत. तर दहावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन तसेच अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा २ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत.

प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफअंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा शुकवार २३ जानेवारी २०२६ ते सोमवार ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह) सोमवार ०२ फेब्रुवारी २०२६ ते बुधवार १८ फेब्रुवारी २०२६ (शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह) शाळा / कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोज़न करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. उपरोक्त परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. महामंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांच्या सहीने याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular