24.5 C
Ratnagiri
Monday, December 8, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeChiplunआपत्कालीन दरवाजा अचानक उघडला धावत्या एसटी बसमधून महिला कोसळली

आपत्कालीन दरवाजा अचानक उघडला धावत्या एसटी बसमधून महिला कोसळली

रस्त्यावर असणारे खड्डे आणि दगड यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.

धावत्या एसटी बसचा आपत्कालीन दरवाजा (संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग) अचानक उघडला आणि एक तरुण विवाहिता बसमधून थेट रस्त्यावर कोसळली. गंभीर जखमी झालेल्या या महिलेला अत्यवस्थ अवस्थेत डेरवणच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान यामुळे मोडक्यातोडक्या एसटी बसेसचा प्रश्न ऐरणीवर आला असून जनतेच्या सुरक्षिततेची हमी महामंडळ देणार का? असा प्रश्न प्रवासी जनतेकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान आ. शेखर निकम यांनी या अपघाताची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी केली असून संबंधित महिलेला न्याय देण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.

अचानक दरवाजा उघडला – अधिक वृत्त असे की, गुहागर गणेशखिंड मार्गे – रत्नागिरी या एसटी बसमधून सौ. प्रियंका विनोद कुंभार (वय ३५, रा. दहिवली, शिंवडेवाडी) या रविवारी प्रवास करीत होत्या. एसटी बसला मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्यामुळे त्या उभ्यानेच प्रवास करीत होत्या. त्या एसटीच्या आपत्कालीन उभ्या राहिल्या खिडकीजवळ होत्या. बसमधून खाली पडल्या बस दहिवली शिवडेवाडी येथे आली असता चालत्या बसचा आपत्कालीन दरवाजा अचानक उघडला गेला आणि प्रियंका कुंभार त्या दरवाजातून थेट रस्त्यावर पडल्या. रस्त्यावर असणारे खड्डे आणि दगड यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असून डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.

पोलीस दाखल – घटनास्थळी सावर्डे पोलीस, चिपळूण एसटी आगाराचे प्रमुख दीपक चव्हाण, वाहतूक नियंत्रक वंदना काजरोलकर, आदी अधिकारी दाखल झाले. सदरची बस ही गुहागर एसटी आगाराची आहे. एसटीच्या ताफ्यात मोडक्या तोडक्या बसेस मोठ्या प्रमाणावर आहेत. दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने असे प्रकार घडत असून यामुळे प्रवाशांचा प्रवास मात्र धोक्याचा ठरत आहे, असे संतप्त प्रवाशांमध्ये बोलले जाते.

आ. निकमांनी घेतली दखल – दरम्यान या संदर्भात आ. शेखर निकम यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी करताना संबंधित महिलेला न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. अन्यथा याचा योग्य विचार केला जाईल, असा इशारा आ. निकम यांनी दिला आहे. त्याचबरोबर संबंधित महिलेच्या उपचाराचा सारा खर्च महामंडळाने करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular