25.3 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeIndiaआयुष्यात निर्माण झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीचा एक किस्सा

आयुष्यात निर्माण झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीचा एक किस्सा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली - मुंबई जोडणारा ग्रीन एक्सप्रेस वेच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.

आपली पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ याचा ताळमेळ ज्यांना जुळवायला जमला तो आयुष्यात खूप यशस्वी होऊ शकतो. आणि याचे एक जिते जागते व्यक्तिमत्व म्हणजे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी.

हरियाणाच्या सोहना मध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणामध्ये त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीचा एक किस्सा सांगून गौप्यस्फोट केला आहे.

तेंव्हा त्यांनी सांगितले कि, ‘माझं तेंव्हा नुकतंच लग्न झाले होते,  त्यावेळी रामटेकमध्ये रस्ते बांधकाम सुरु होते,  आणि नेमक माझ्या सासऱ्यांचं घर रस्त्याच्या मधोमध येत होतं. शासकीय काम कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पाडणे गरजेच असल्याने, माझ्या पत्नीला पुसटशीही कल्पना न देता मी सासऱ्यांच्या घरावर बुलडोझर चालवून, तो संबंधित रस्ताचे कामकाज पूर्ण केले’ आणि सामान्य जनतेची रहदारी सुरळीत करण्यात आली. असा गौप्यस्फोट नितीन गडकरी यांनी भर कार्यक्रमामध्ये केला.

त्याचप्रमाणे हरियाणा, राजस्थान आणि गुजरातसह विविध राज्यांतून जाणाऱ्या दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासह हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेचा आढावा घेतला. आता दिल्ली ते मुंबई प्रवास फक्त १२ तासांमध्ये पार पडणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली – मुंबई जोडणारा ग्रीन एक्सप्रेस वेच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. कोरोना काळामुळे महामार्गाचे कामाला स्थगिती मिळाली होती, परंतु आता या रस्त्याचे काम पूर्ववत सुरु झाले आहे. १ लाख कोटी रुपये खर्च करुन हा महामार्ग तयार करण्यात येत असल्याची माहिती नितीन गडकरीनी दिली. काही वेळप्रसंगी सर्व नाती गोती बाजूला ठेवून प्रत्यक्ष विचार करणे गरजेचे असते. असे या अनुभवावरून गडकरींनी आवर्जून सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular