24.8 C
Ratnagiri
Monday, November 24, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriपावस परिसरात आरोग्यसेवेचा नवा प्रकाश - मंत्री उदय सामंत

पावस परिसरात आरोग्यसेवेचा नवा प्रकाश – मंत्री उदय सामंत

दीड कोटीच्या आयुष्मान आरोग्यकेंद्राचे लोकार्पण झाले.

परिसरातील नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि त्याचा लाभ प्रत्येकाला मिळावा, या दृष्टिकोनातून आयुष्मान आरोग्यकेंद्र पावसमध्ये उभारण्यात आले. उर्वरित इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही. त्यामुळे हे आरोग्यकेंद्र पावस परिसरातील ग्रामस्थांना आरोग्यदायी ठरणार आहे, असे मत उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. पावस आयुष्मान आरोग्यकेंद्राच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष कांबळे, डॉ. अतुल पाटील, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी एन. जी. बेंडकुळे तसेच पावस ग्रामपंचायत सरपंच चेतना सामंत, उपसरपंच प्रवीण शिंदे, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, माजी नगरसेवक सुदेश मयेकर, बिपीन बंदरकर, तुषार साळवी, नेताजी पाटील, गोळप सरपंच कीर, उपसरपंच संदीप तोडणकर, नाखरे सरपंच विजय चव्हाण, डॉ. प्रवीण शेवाळे आदी उपस्थित होते, तसेच पावस पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. सामंत म्हणाले, ‘पावस आयुष्मान आरोग्यकेंद्राच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. दीड कोटीच्या आयुष्मान आरोग्यकेंद्राचे लोकार्पण झाले. त्यामध्ये आणखी सुविधा उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने मी विशेष प्रयत्न करणार आहे, जेणेकरून शहराच्या ठिकाणचा आरोग्याचा ताण कमी होईल. यासाठी आयुष्मान केंद्राकडे विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. येथील सुविधांचा लाभ घेताना प्रत्येक नागरिकांनी आरोग्य चांगले ठेवण्याच्यादृष्टीने प्रयत्न आहेत. कमीत कमीवेळा या आरोग्यकेंद्राचा लाभघ्यावा जेणेकरून आपले सर्वांचे आरोग्य चांगले राहावे.

११ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन – पावस परिसरातील गौतमी नदीवरील पुलाच्या नवीन बांधकामासाठी ८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्या कामाचा प्रारंभदेखील काल गौतमीकिनारी करण्यात आला, तसेच पावस बाजारपेठमार्गे गोळप या रस्त्यावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. या समस्येवर उपाय म्हणून या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी तीन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. त्या कामाचा प्रारंभ पावस चौकात करण्यात आला. अशाप्रकारे पावसमध्ये ११ कोटींच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular