HomeRatnagiriशाळांच्या नावात 'ग्लोबल', 'इंटरनॅशनल' वापरण्यास बंदी

शाळांच्या नावात ‘ग्लोबल’, ‘इंटरनॅशनल’ वापरण्यास बंदी

शिक्षण विभागाने अशा शाळांच्या नावात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील अनेक खासगी शाळांनी पात्रता आणि संलग्रतेचे निकष पूर्ण नसतानाही आपल्या नावात ‘ग्लोबल’, ‘इंटरनॅशनल’, ‘सीबीएसई’, ‘इंग्लिश मीडियम’ असे नावे वापरली आहेत. ही कृती बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करत शिक्षण विभागाने अशा शाळांच्या नावात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यस्तरीय प्राधिकरणाच्या सचिवांच्या निर्दे शानुसार, अशा शाळांची मान्यता कोणत्या शिक्षण मंडळाकडून आहे, याची तपासणी होणार आहे. तसेच, शाळा व्यवस्थापनांना नावे बदलण्यास सूचना देऊन कार्यवाही केली जाणार आहे. नव्याने येणाऱ्या प्रस्तावातील नावाबाबत खातरजमा करूनच तो प्रस्ताव राज्य प्राधिकरणाकडे पाठवण्यात येईल. शाळांच्या नावात आंतरराष्ट्रीय स्तरावरील मंडळाची संलग्नता नसतानाही ‘इंटरनॅशनल’ आणि ‘ग्लोबल’, केंद्र शासनाच्या शिक्षण मंडळाची संलग्नता नसतानाही ‘सीबीएसई’ हा शब्दप्रयोग करणे कायदेशीर नाही, असे शिक्षणं सहसंचालकांनी स्पष्ट केले आहे.

ही कृती बेकायदेशीर आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी शाळांच्या नावात ‘इंटरनॅशनल’, ‘ग्लोबल’, ‘सीबीएसई’, ‘इंग्लिश मीडियम’ असे शब्द वापरले गेले आहेत. या शाळांची संलग्रता तपासून नामांतरासाठी लवकरच कार्यवाही सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. शाळांच्या नांवात ‘इंटरनॅशनल’, ‘ग्लोबल’, ‘सीबीएसई’, ‘इंग्लिश मीडियम’ यासारखे शब्द वापरल्यामुळे शासन, समाज, पालक मात्र आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल होत आहे. शाळांच्या नावात दिशाभूल करणारे शब्द आढळल्यास व्यवस्थापनाला नाव बदलण्यास सांगितले जाईल. यापुढे नव्याने मान्यता मागणाऱ्या किंवा दर्जावाढीसाठी प्रस्ताव सादर करणाऱ्या शाळांची नावांची तपासणी होईल. पालकांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकणारी नावे असल्यास, ती बदलल्या नंतरच प्राधिकरणाकडे शिफारस होईल शिक्षण संचालनालयांतर्गत राज्य प्राधिकरणाकडे येणाऱ्या प्रकरणाबाबत शाळांच्या नावामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आढळली आहे. त्यांच्या नावात ‘इंटरनॅशनल’, ‘ग्लोबल ‘सीबीएसई’, ‘इंग्लिश मीडियम’ यासारखे शब्द वापरले जात आहेत; मात्र खरोखरच्या मान्यतेनुसार ही शाळा मराठी माध्यमात चालत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular