रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणाचे किंगमेकर आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांचा वाढदिवस साखरपा विभागात दिनांक ६ जानेवारी रोजीच साजरा करण्यात आला. यावेळी मला भाषण करता येत नाही आणि भावनाही व्यक्त करता येत नाही मी इच्छा नसताना झालेला आमदार आहे. मात्र लोकांची काम करता येतात. असे शुभेच्छा पर भाषणात बोलताना नमूद केले. मी आमदार झाल्यानंतर पहिल्याच दिवशी निर्णय घेतला की माझ्या मतदार संघातील माता-भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरवेन आणि राजापूर मतदारसंघातील माता बहिणींच्या डोक्यावरचा हंडा उतरण्याचे काम मी पहिल्याच सहा महिन्यात केलं. तालुका टँकर मुक्त केला. तसेच काही कार्यकर्ते मला झेरॉक्स मशीन समजतात इकडे पेपर टाकला की तिकडे डबल प्रिंट आली. काम सांगितलं की लगेच सुरू व्हायला पाहिजे. परंतु त्यामुळे काही कामही होतात.
यावर्षी आपल्या राजापूर, लांजा तालुक्यात दोन मोठे प्रोजेक्ट येत असल्याचे आमदार किरण सामंत यांनी म्हटले. तेही लांजा तालुक्यातील ओसाड माळरानात. त्यामुळे अनेकाना रोजगाराची संधी मिळू शकते. तसेच साखरपा विभागात प्रोजेक्ट आणू शकत नाही. कारण त्यासाठी जागेचा प्रश्न निर्माण होतो तिथे पाण्यासाठी योजना आणू शकतो असे यावेळी आ भैय्या सामंत म्हणाले. मी माझ्या मतदारसंघातील प्रत्येक मुलांना कौशल्य विकासाच्या संधी मिळाव्यात म्हणून अशा शिक्षणाची व्यवस्था करण्याच्या सूचना शाळांना दिल्या होत्या परंतु एकाही शाळेने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी खंत त्यांनी मांडली. विकासाची काम कधीही पूर्ण होत नाहीत आणि थांबतही नाहीत. एक काम झालं की दुसरं काम पुढे येतं. परंतु यापुढे शाळांची काम असतील आरोग्याची काम असतील ते आपण प्राधान्याने करू असेही आश्वासन यावेळी दिले.
या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र महाडिक, माजी आमदार सुभाष बने, माजी शिक्षण सभापती विलास चाळके, उपजिल्हाप्रमुख राजेश पत्याणी, माजी सभापती जया माने, देवरूख पोलीस निरीक्षक झावरे नायब तहसीलदार गिरी, तालुकाप्रमुख प्रमोद पवार, विलास भाई बेर्डे, विभाग प्रमुख राजू कामेरकर, बापू शेटे, उद्योजक विष्णू शेठ रामाने, संजय गांधी, प्रसाद सावंत सचिन मांगले, हेमंत शिंदे, विलास सुकम, प्रसाद अपंडकर, रेश्मा परशेटे, ओंकार कोलते, अंकुश सुर्वे आदींसह मतदार संघातील अनेक कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.

