23.9 C
Ratnagiri
Friday, January 16, 2026

जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती

कोकणासह जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाला...

हातखंब्याजवळ अपघात, मोटरची दुचाकीला धडक, दापत्य जखमी

रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावरील खेडशी महालक्ष्मी...

जि.प. निवडणुकांसाठी जिल्ह्यात महायुती शिवसेना-भाजपसोबत राष्ट्रवादीही येणार?

५ फेब्रुवारीला होणारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी...
HomeRajapurशीळच्या सड्यावर वणव्याने आंबा बागेचे नुकसान

शीळच्या सड्यावर वणव्याने आंबा बागेचे नुकसान

शेतकऱ्याचे सुमारे ७० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

शहराजवळील शीळ येथील डोंगर परिसराला (सडा) गेल्या दोन दिवसांपासून लागलेल्या भीषण वणव्यामुळे मोठा परिसर होरपळून निघाला आहे. ग्रामस्थांनी जिवाची बाजी लावून वणव्यावर नियंत्रण मिळवले असले, तरीही या आगीत गुरांचे गवत आणि शेतकऱ्यांच्या बागांमधील सुमारे पंधरा आंबा कलमांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ७० हजार रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचा अंदाज आहे. तसेच वैरणीसाठी राखून ठेवलेले गवत जळून खाक झाल्यामुळे गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वेगवान वारा आणि वाळलेले गवत यामुळे शीळच्या सड्यावर अचानक आग लागली. हा वणवा वेगाने पसरला. आगीची झळ लगतच्या गोठणे-दोनिवडे भागालाही बसली आहे. वणवा बागांकडे सरकू लागल्याचे पाहून शीळ येथील ग्रामस्थांनी तातडीने धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत सुमारे साडेतीन तास निकराचे प्रयत्न करून ग्रामस्थांनी वणव्यावर नियंत्रण मिळवले.

ग्रामस्थांच्या या सतर्कतेमुळे अनेक शेतकऱ्यांच्या आंबा-काजूच्या बागा राख होण्यापासून वाचल्या. बहुतांश बागा वाचवण्यात यश आले असले तरी, एका शेतकऱ्याच्या हापूस बागेतील १५ ते २० झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यामुळे त्या शेतकऱ्याचे सुमारे ७० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ऐन हंगामाच्या तोंडावर झाडे जळाल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. या वणव्याचा सर्वाधिक फटका गुरांच्या चाऱ्याला बसला आहे. सुमारे दीड किलोमीटर परिसरातील गवत पूर्णपणे जळून खाक झाले आहे. येत्या चार महिन्यांत आणि पावसाळ्याच्या सुरवातीला लागणाऱ्या वैरणीची सोय कशी करायची, या चिंतेत शेतकरी आहेत.

दरवर्षी लाखोंचे नुकसान – नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये वणव्यांचे सत्र सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून राजापूर परिसरात दिवाळीनंतर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये वणवा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे दरवर्षी बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. वणवा नेमका लागतो की लावला जातो, याबाबत प्रशासन आणि ग्रामस्थांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज असून, या वाढत्या घटनांबाबत शेतकऱ्यांमधून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular