23.9 C
Ratnagiri
Friday, January 16, 2026

जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती

कोकणासह जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाला...

हातखंब्याजवळ अपघात, मोटरची दुचाकीला धडक, दापत्य जखमी

रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावरील खेडशी महालक्ष्मी...

जि.प. निवडणुकांसाठी जिल्ह्यात महायुती शिवसेना-भाजपसोबत राष्ट्रवादीही येणार?

५ फेब्रुवारीला होणारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी...
HomeRatnagiriरत्नागिरी शहरात क्रांतीनगर येथे कचरा डेपोत सापडले नवजात जिवंत अर्भक

रत्नागिरी शहरात क्रांतीनगर येथे कचरा डेपोत सापडले नवजात जिवंत अर्भक

दोन दिवसांचे नवजात पुरुष जातीचे अर्भक जिवंत अवस्थेत आढळून आले आहे.

रत्नागिरी शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. शहरातील क्रांतीनगर येथील कचरा डेपोमध्ये केवळ दोन दिवसांचे नवजात पुरुष जातीचे अर्भक जिवंत अवस्थेत आढळून आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कचरा डेपोच्या परिसरात हे अर्भक पडल्याचे काही लोकांच्या निदर्शनास आले. क्रांतिनगर झोपडपट्टीतील रहिवाशांना कचरा डेपोजवळ बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला म्हणून हा प्रकार काय आहे? हे पहाण्यासाठी रहिवाशांनी कचरा डेपोजवळ धाव घेतली. त्यावेळी एक अर्भक तेथे रडताना दिसले. लगेचच रहिवाशांनी ही माहिती रत्नागिरी शहर पोलिसांना दिली.

त्यानंतर तात्काळ पोलिस घटनास्थळी दाखाल झाले आणि त्यांनी एक दिवसाच्या अर्भकाला रत्नागिरी शासकिय रुग्णालयात दाखल केले. सध्या या बालकाला रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान, पोटच्या गोळ्याला अशा प्रकारे उघड्यावर सोडून देणाऱ्या निर्दयी माता-पित्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. रत्नागिरी शहर पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि रुग्णालयातील नोंदी तपासल्या जात आहेत. या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत असून अशा कठोर काळजाच्या पालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular