साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती आणि भाजप शिवसेना महायुती यांच्यामध्ये काटे की टक्कर पहायला मिळत असून शुक्रवारी रात्रौ उशीरापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार महायुतीने ११४ हा जादुई बहुमताचा आकडा गाठला असला तरी पारडे अजूनही दोलायलान अवस्थेत असल्याने मुंबई कोणाची या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळायचे आहे. उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला ६५ जागा मिळाल्या असून त्यांचे बंधू राज ठाकरे यांच्या पक्षाला अवघ्या ६ जागा मिळाल्या आहेत. एकुण २२७ जागांपैकी शुक्रवारी सायंकाळी २२१ जागांचे कल हाती आले होते. त्यामध्ये भाजपला ८७तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने २७ जागांवर निर्णायक आघाडी मिळविली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला ६५ जागा तर राज ठाकरेंच्या मनसेला ६ जागा मि ळताना दिसत होत्या. ठाकरे बंघूंसोबत एकत्र निवडणूक लढविणाऱ्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला १ जागा मिळाली असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ३ जागा मिळाल्या तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला २२ जागा मिळताना दिसत आहेत. अन्य १० ठिकाणी अन्य उमेदवार विजयी झाले आहेत.
अभुतपूर्व गोंधळ – गुरूवारी २२७ प्रभागांमध्ये अभुतपूर्व गोंधळात मतदान झाले होते. तब्बल ९ वर्षांनी ही निवडणूक झाल्याने राजकीय पक्षांम ध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र म तदानाच्यावेळी मोठा गोंधळ पहायला मिळाला. अनेक मतदारांची नावे यादीत नसल्याने संताप व्यक्त होत होता. ईव्हीएममध्ये अनेक ठिकाणी बिघाड झाला. त्यामुळे मतदारांना रांगेत तिष्ठत उभे रहावे रहावे लागले. म तदान केल्यानंतर बोटाला लावण्यात येणारी शाई पुसली जात असल्याने दुबार मतदानाचा प्रयत्न झाला होता. मोठ्या प्रमाणावर पैसे वाटपाचे आरोप होत होते. अशा अभुतपुर्व गोंधळात गुरूवारी मतदान झाले.
३ टक्के मतदान कमी – या अभुतपुर्व गोंधळामुळे मुंबईत जेमतेम ५३.९० टक्के मतदान झाले. २०१७ मध्ये झालेल्या मतदानापेक्षा हे मतदान ३ टक्क्यांनी कमी झाले. निवडणूक आयोगामुळे हे. मतदान घटल्याचा आरोप करण्यात येतो आहे. त्याचा परीणाम निकालावर झाल्याचा आरोपही होतो आहे.
सकाळपासून मतमोजणी – अभुतपूर्व गोंधळात मतमोजणीला शुक्रवारी सकाळी १० वाजता सुरूवात झाली. एकूण २३ मतम ोजणी केंद्रांवर ही प्रक्रिया एकावेळी सुरू झाली. एकावेळी ४ प्रभागांची मतमोजणी हाती घेण्यात आली. त्यामुळे मतमोजणीचा वेग मंदावला होता. सुरूवातीला पोस्टल बॅलेटची मोजणी हाती घेण्यात आली. त्यामध्ये महायुती आणि ठाकरे बंधूंच्या आघाडीला संमिश्र यश मिळाले.
काँटे की टक्कर – मतमोजणी जसजशी पुढे जावू लागली त्यावेळी ठाकरे बंधू आणि महायुतीमध्ये काँटे की टक्कर पहायला मिळत होती. सुरूवातीला शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या उमेदवारांनी मुसंडी मारल्याचे चित्र पहायला मिळाले. मराठी बहुल इलाक्यात ठाकरे बंधूंना मोठे यश मिळताना पहायला मिळाले. मात्र काहीवेळातच भाजपनेही मुसंडी मारत ठाकरेबंधूंना मागे टाकत आघाडी घेतली.
मराठी बहुल विभागात ठाकरे आघाडीवर – मुंबईतील दादर, लालबाग परळ, वरळी, भांडुप, गिरगांव विलेपार्ले, आदी मराठी बहुल वस्त असणाऱ्या प्रभागांमध्ये प्रथमपासून ठाकरेबंधंच्या युतीचे उमेदवार आघाडीवर होते. मात्र त्याचवेळी मराठी बहुल विभागात भाजपचे उम दवारही झपाटयाने पुढे जावू लागले.
दिग्गज मागे आणि पुढे – मतमोजणी दरम्यान अनेक दिग्गजांचे पारडे देखील मागे पुढे होताना पहायला मिळत होते. दादर, शिवसेनाभवन, प्रभादेवी परिसरात उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा जोर दिसून आला. त्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष सुरू केला.
शिंदेंच्या शिलेदारांचा पराभव – दादरमध्ये एकनाथ शिंदेंचे शिलेदार माजी आमदार सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान सरवणकर यांचा झालेला पराभव धक्कादायक मानला जात आहे. शिंदेंचे आणखी एक शिलेदार खासदार रविंद्र वायकर यांच्या कन्या दिप्ती वायकर यांनादेखील. जोगेश्वरीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.
भाजपलाही धक्के – शिंदेंसह भाजपच्या उमेदवारांनाही धक्के मिळाले. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणारे रविराजा यांचा झालेला पराभव भाजपसाठी धक्कादायक होता. तर प्रभाग क्रमांक २१० मध्ये भाजपने अधिकृत उमेदवारी न दिल्याने नाराज असलेल्या शिल्पा केळूसकर यांनी शिंदेसेनेच्या उमेदवाराचा पराभव करत धक्का दिला. केळूसकर यांनी पक्षाने दिलेल्या एबी फॉर्मची झेरॉक्स निवडणूक अर्जासोबत जोडली होती. मात्र त्यानंतर जागावाटपात ही जागा शिवसेनेला सोड़ण्यात आली होती. शिल्पा केळूसकर यांनी उमेदवारी मागे घेण्यास नकार दिला होता. त्या शिल्पा केळूसकर विजयी झाल्या. विजयानंतर त्यांनी आपण भाजपातच असल्याचे सांगितले.
तेजस्वी घोसाळकरांचा विजय – दहिसरमधील प्रभाग क्रमांक २ मधून शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई तेजस्वी घोसाळकर यांनी ऐनवेळी भाजपांमध्ये प्रवेश केल्याने खळबळ उडाली होती. विनोद घोसाळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सुनेविरोधात तिचीच एकेकाळची जिवलग मैत्रिण धनश्री कोलगे यांना रिंगणात उतरवले. हा सामना अटीतटीचा होणार असे वाटत असतानाच तेजस्वी घोसाळकर यांनी दणदणीत मतांनी विजय मिळवीला.
दिग्गजांचा विजय – मानखुर्दमधून माजी पत्रकार आणि भाजपा उमेदवार नवनाथ बन यांनी विजय मिळविला. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभु यांच्या कन्या तेजस्वी प्रभु या देखील दिंडोशीमधून विजयी झाल्या आहेत. अमित साटम यांच्या भावाच्या पत्नी अक्षया साटम यादेखील अंधेरीमधून विजयी झाल्या. भाजपानेते प्रविण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर हे देखील अडीच हजार मतांनी निवडून आलेः काही दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. तर काहीं दिग्गजांनी धक्कादायक विजयाची नोंद केली.
भाजपचा जल्लोष – सायंकाळी उशीसपर्यंत मतमोजणी सुरू होती. मात्र भाजप-शिवसेना युतीने निर्णायक आघाडी घेतल्यानंतर भाजपा कार्यालयात जल्लोष सुरू झाला. मिठाई वाटण्यात आली.
२५ वर्षांनंतर सत्ता गमावली – निवडणुकीमध्ये या उद्धव ठाकरेंना मुंबई महापालिकेत असणारी त्यांची २५ वर्षापासूनची सत्ता गमवावी लागली. सोबतच ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली येथील सत्ता देखील गमवावी लागली आहे. तर भाजपने जोरदार मुसंडी मारत २९ पैकी १९ महापालिकांमध्ये आपल्या मित्रपक्षांसह यश मिळवत सत्ता संपादन केली आहे.

