पनवेल आणि न कळंबोली रेल्वे स्थानकांदरम्यान गर्डर उभारणीच्या कामासाठी विशेष ट्रफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार, आहे. त्याचा परिणाम कोकण रेल्वेमार्गावरील प्रवासी सेवेवर होणार असून तुतारी, मांडवी, कोकणकन्या, मत्स्यगंधा एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होणार आहे. १८ जानेवारीपासून १५ फेब्रुवारी दरम्यान सहावेळा ब्लॉक घेतले जाणार आहेत. ब्लॉक काळात तुतारी एक्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस, मत्स्यगंधा एक्स्प्रेस, म ांडवी एक्स्प्रेस या प्रमुख गाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. कोकणातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची पनवेलजवळ रखडपट्टी होणार आहे. डेडिकेटेड फ्रेट कारिडॉर कॉर्पोरेशन प्रकल्पांतर्गत ओपन वेब गर्डर उभारणीसाठी मध्य रेल्वेने पनवेल-कळंबोली दरम्यान हे ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम मेल-एक्स्प्रेस गाड्यांवर होणार आहे.
१८ जानेवारीच्या मध्यरात्री १.२० ते ३.२० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या काळात दौंड-ग्वाल्हेर एक्स्प्रेस कर्जत-कल्याण-वसईमार्गे वळविण्यात येणार आहे. मंगळुरू-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस पनवेल येथे मध्यरात्री ३.१४ ते ३.२० वाजेपर्यंत थांबवण्यात येईल. २५ जानेवारीच्या मध्यरात्री १.२० ते पहाटे ५.२० वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. परिणामी दौंड-ग्वाल्हेर एक्स्प्रेस कर्जत-कल्याण-वसईमार्गे वळविण्यात येईल आणि मंगळुरू-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस सोमटणे स्थानकावर मध्यरात्री २.५८ ते पहाटे ५.२० या वेळेसाठी थांबवण्यात येईल. तसेच मुंबईकडे येणाऱ्या कोकणकन्या, तुतारी, मत्स्यगंधा एक्स्प्रेस ठिकठिकाणी थांबवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मडगावकडे जाणारी मांडवी एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ८.२० वाजता सुटेल.
फेब्रुवारीमध्ये चार ब्लॉक – मध्य रेल्वेने फेब्रुवारी महिन्यात चार ब्लॉक जाहीर केले आहेत. त्यानुसार ३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १.२० ते पहाटे ४.२० वाजेपर्यंत, १० फेब्रुवारीच्या मध्यरात्री १.२० ते ३.२० वाजेपर्यंत, १२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ ते पहाटे ४ वाजेपर्यंत आणि १४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ ते पहाटे ४ वाजेपर्यंत कळंबोली-पनवेलदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहेत. त्यामुळे अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास विविध ठिकाणी नियंत्रित केला जाणार आहे.

