21.2 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriसंगमेश्वरमध्ये बिबटयाला उपचारासाठी नेताना मृत्यू

संगमेश्वरमध्ये बिबटयाला उपचारासाठी नेताना मृत्यू

बिबट्या बसलेल्या अवस्थेत अत्त्यंत अशक्त स्थितीत आढळून आला.

संगमेश्वर तालुक्यात बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे मानव वन्यजीव संघर्षाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मौजे बोरसूत शिंदेवाडी परिसरात घडलेली घटना हळहळ व्यक्त करणारी ठरली आहे. कोसुंब ते फणसवळे रस्त्याच्या कडेला एक बिबट्या बसलेल्या अवस्थेत अत्त्यंत अशक्त स्थितीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सदर बिबट्या कोणालाही इजा पोहोचू नये तसेच त्याचे प्राण वाचावेत या उद्देशाने वनविभागाच्या पथकाने अत्यंत काळजीपूर्वक पिंजऱ्याच्या साह्याने त्याला सुरक्षित ताब्यात घेतले. प्रत्यक्ष पाहणीत बिबट्या फारच अशक्त असल्याचे स्पष्ट झाले होते. पुढील त्यानंतर तातडीने उपचारासाठी बिबट्याला टी.टी. सेंटर, पुणे येथे रवाना करण्यात आले. मात्र दुर्दैवाने पुणे येथे नेत असतानाच या बिबट्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

मृत बिबट्या नर जातीचा असून त्याचे वय अंदाजे पाच ते सहा वर्षे असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. या घटनेमुळे वन्यप्रेमी व नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघु चिकित्सालय देवरुख -यांच्या उपस्थितीत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले असून, सर्व अवयव नियमानुसार जाळून नष्ट करण्यात आले आहेत. या प्रकरणी वनपाल संगमेश्वर-देवरुख यांनी प्र.गु. रि. क्रमांक वप्रार ०२/२०२६ दिनांक १५/०१/२०२६ नुसार नोंद केली आहे. सदर कारवाई ही विभागीय वनाधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड व वनाधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल देवरुख सागर गोसावी, वनरक्षक सहयोग कराडे, आकाश क़डूकर, सुप्रिया काळे व सुरज तेली यांनी केली.

दरम्यान, संगमेश्वर तालुक्यातील जंगलालगतची मानवी वस्ती, मोकाट जनावरे व जंगलातील अधिवासात. होत असलेले बदल यामुळे बिबट्यांचा मानवी वस्तीजवळील वावर वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी रात्रीच्या वळी सतर्क राहणे, लहान मुलांवर लक्ष ठेवणे तसेच वन्यप्राणी दिसल्यास स्वतःहून हस्तक्षेप – न करता तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे. ङ्गअशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा कोणताही वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास नागरिकांनी वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ वर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular