21.2 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriकिनारपट्टी, गावांच्या संरक्षणासाठी बंधारे कोकण आपत्ती सौम्यीकरण योजना

किनारपट्टी, गावांच्या संरक्षणासाठी बंधारे कोकण आपत्ती सौम्यीकरण योजना

आरे आणि नेवरे येथील कामांना प्राधान्याने सुरुवात होणार आहे.

राज्यशासनाने कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील एकूण २५ संवेदनशील ठिकाणी धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्याच्या कामांना प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी दिली आहे. या सर्व कामांसाठी शासनाने सुमारे ७८ कोटी ७८ लाखांहून अधिक निधीची भरीव तरतूद केली आहे. अनेक ठिकाणी सीआरझेड व पर्यावरण विभागाचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामांना वेग आला आहे, अशी माहिती पत्तन अभियंता विणा पुजारी यांनी दिली. रत्नागिरी तालुक्यातील आरे आणि नेवरे येथील कामांना प्राधान्याने सुरुवात होणार आहे. आरे येथे ८२५ मीटर लांबीच्या बंधाऱ्यासाठी ८ कोटी १९ लाख ८० हजार ७६४ रुपये, नेवरे येथे ५२५ मीटर लांबीच्या कामासाठी ५ कोटी २३ लाख ८७ हजार ६७३ रुपयांची तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे, तसेच वेळणेश्वर (वेंगणी) येथे ५ कोटी ५३ लाख ५९ हजार, घेरापूर्णगड येथे २ कोटी ९३ लाख ७७ हजारांच्या निधीतून संरक्षक बंधारे उभारले जात आहेत. विशेष म्हणजे गणपतीपुळे येथील संवेदनशील किनाऱ्यासाठी ३० लाख ३६ हजार रुपयांच्या जिओ बॅग्स बंधाऱ्याचे कामही होणार आहे.

दापोली तालुक्यातील किनारपट्टीच्या गावांमध्येही या योजनेचा मोठा विस्तार झाला आहे. आडे येथे ३ कोटी ५३ लाख १२ हजार, कर्दे (भाग १) येथे ३ कोटी ५३ लाख ५ हजार तर कर्दे (भाग २) येथे ४ कोटी ९२ लाख २३ हजार, कोळथरे येथे ३ कोटी ५२ लाख ६९ हजार, लाडघर येथे ४ कोटी २२ लाख ३९ हजार आणि मुरूड येथे ५ कोटी ६३ लाख ७हजार व ५ कोटी ६४ लाख २४ हजार रुपयांची दोन स्वतंत्र कामे मंजूर आहेत. हर्णे (भाग १ व २) मिळून सुमारे ८ कोटी ३० लाखांहून अधिक निधीतून बंधारे बांधले जात आहेत. पाजपंढरी येथे ३ कोटी ५१ लाख ३९ हजार, बुरोंडी येथे ३ कोटी ५३ लाख ५ हजार, पाडलेमध्ये ३ कोटी ९७ लाख ९७ हजार आणि साळुंद्रे येथे ४ कोटी ५८ लाख ४९ हजारांच्या निधीला तांत्रिक मान्यता प्राप्त झाल्या. करंजगाव येथे ३ कोटी ८९ लाख ४६ हजार रुपयांचे कामही समाविष्ट आहे.

गणेशगुळे, भाट्ये, गावखडीचे संरक्षण – रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथे ७ कोटी ९२ लाख ३२ हजार रुपये खर्चाचा १,१७२ मीटर लांबीचा बंधारा, भाट्ये येथे ६ कोटी ३३ लाख ८१ हजार रुपये खर्चाचा ८८४ मीटरचा बंधारा आणि गावखडी येथे ७ कोटी ९ लाख ३५ हजार रुपये खर्चाचे संरक्षक काम हाती घेण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular