पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली लांजात शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तालुक्यात शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष महायुती म्हणून निवडणूक लढणार आहेत. भांबेड पं.स. गण ही एकमेव जागा भाजपला देण्यात आली असून बाकी सर्व जागावंर शिवसेनेचे उमेदवार लढणार आहेत. लांजा तालुका शिवसेना कार्यालय येथे मंगळवारी शिवसेना-भाजप महायुतीच्यावतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत महायुतीच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये पंचायत समिती ८ तर जिल्हा परिषद ४ अशा एकूण १२ उमेदवारांची नावे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, महायुतीचे प्रचार प्रमुख प्रसन्न शेट्ये, राजेंद्र धावणे, जगदीश राजापकर, चंद्रकांत मांडवकर, भाजप तालुक अध्यक्ष शलेंद्र खामकर, विराज हरमले व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
जि.प. उमेदवारांची नावे – जिल्हा परिषद गवाणे गट- संतोष कृष्णा रेवाळे, आसगे गट सौ. मनिषा गणेश लाखण, भांबेड गट सौ. विनिता विनय गांगण, साटवली गटातून सौ. लिला मोहन घडशी.
पंचायत समितीचे उमेदवार – पंचायत समिती गणामध्ये आसगे गणातून – मानसी सिध्देश्वर आंबेकर, वेरवली गणातून – सौ. साक्षी भिकाजी चव्हाण, गवाणे गणातून – सौ. दीपाली जयवंत दळवी, खानवली गणातून यशवंत देवू वाकडे, भांबेड गणातून शैलेश मनोहर खामकर (भाजपा), आदेश प्रभानवल्ली गणातून- उमेश अरूण पत्की, साटवली गणातून दत्तात्रय आंबोळकर, वाकेड गणातून सौ. रसिका रमाकांत मेस्त्री. युतीमध्ये भाजपाला एक जागा सोडण्यात आली आहे. तर बाकी सर्व जागा शिवसेना लढत आहे.

