28.2 C
Ratnagiri
Friday, February 20, 2026

डिंगणी परिसरात गवारेड्यानंतर वन्यप्राण्यांचा धुडगुस आता बिबट्याचा हैदोस

शांत व ग्रामीण वातावरणासाठी ओळखला जाणारा डिंगणी...

होळीसाठी कोकण रेल्वे सज्ज मुंबई – सावंतवाडी स्पेशल गाडया

होळीच्या सणासाठी कोकण रेल्वे सज्ज झाली असून...
HomeChiplunचिपळूणतील ९१ ग्रामपंचायतीचा कारभार लोकप्रतिनिधी विना; निवडणुका कधी होणार?

चिपळूणतील ९१ ग्रामपंचायतीचा कारभार लोकप्रतिनिधी विना; निवडणुका कधी होणार?

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लवकर व्हाव्यात, अशी मागणी होत आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर लोकप्रतिनिधी कारभार चालविणार आहेत. मात्र, चिपळूण तालुक्यातील मुदत संपलेल्या ९१ ग्रामपंचायती सध्या लोकप्रतिनिधीविना पोरक्या झाल्या आहेत. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लवकर व्हाव्यात, अशी मागणी होत आहे. चिपळूण तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली आहे अशा ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे, त्यामुळे निश्चितच विकासाला सुद्धा खिळ बसत आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात आणि गाव कारभार सुरू व्हावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. नुकत्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या आहेत, त्यामुळे आता पंचायत समिती स्तरावर लोकप्रतिनिधी नियुक्त झाले आहेत. त्यांच्यामार्फत हा कारभार चालवला जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची देखील लवकरात लवकर प्रशासक राजमधून सुटका व्हावी, असे बोलले जात आहेत.

चिपळूण तालुक्यामध्ये १३० ग्रामपंचायतींमधील सुमारे ९१ ग्रामपंचायतींचा कारभार हा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत चालवला संपलेली आहे. या ग्रामपंचायतींवर लोकप्रतिनिधी जात आहे. म्हणजेच ९१ ग्रामपंचायतींची मुदत खेर्डी, सावर्डे, चिंचघरी, मिरजोळी, अलोरे, निवडून येणे महत्त्वाचे आहेत. तालुक्यातील कोलवली कोसबी, निवळी, कौन्हे, मोरवणे, वालोटी, वालोपे, दळवटणे, मुंडे तर्फे चिपळूण, कळंबस्ते, गांग्रई, पोसरे, कोंढे, शिरळ, कळमुंडी, खोपड, उभळे, कौढरताम्हणे, बोरगाव, वाधिवरे, चिवेली, रामपूर, मार्गताम्हणे खुर्द, कात्रोली, भोम, मालघर, कळवंडे, पाचाड, ताम्हणमळा, रेहेळ वैजी, निरवाडे, पेढांबे, तळसर, कापसाळ, धामणवणे, नागावे कंभाली, कॉडफणसवणे, मूर्तवडे, वीर, तोंडली, कळंबट, वडेरु, पिंपळी अनारी, अडरे, पिलवली तर्फे सावर्डे, तुरंबव, आकले, दहिवली बुद्रुक, दहिवली खुर्द, खरवते, खुर्द, पिंपळी बुद्रुक, कोळकेवाडी, खडपोली, ओवळी, रिक्टोली, मुंढे तर्फे सावर्डे, तळवडे, आगवे, कुडप, येगाव, नायशी, कोकरे, खेरशेत, कोंडमळा, निळ्ळ्हळ, डेरवण, दोणवली, मांडकी, मांडकी खुर्द, मार्गताम्हाणे, नांदगाव बुद्रुक, नांदगाव खुर्द, पाथर्डी आणि रावळगाव या ग्रामपंचायतींमध्ये सध्या प्रशासकीय राज आहे.

RELATED ARTICLES

Most Popular