29.1 C
Ratnagiri
Monday, February 3, 2025

राजापूर पालिकेच्या गोठ्याची दुरवस्था

तीव्र उतार आणि नागमोड्या वळणांच्या राजापूर शहरातील...

गावाचा सर्वांगीण विकास करणार – आ. शेखर निकम

गावाच्या विकासासाठी निधी, योजना आणि आवश्यक सुविधा...
HomeTechnologyहैप्पीवाला बर्थडे टू यू गुगल

हैप्पीवाला बर्थडे टू यू गुगल

आज २७ सप्टेंबर, आपल्या गुगल गुरुचा २३ वा वाढदिवस. यासाठी खास डूडल तयार करण्यात आले आहे. जगभरातील महत्त्वाच्या घटना आणि व्यक्तींबाबत आदर व्यक्त करण्याची गुगलची अनोखी युक्ती आहे. व्यक्ती ज्या दिवशी जन्म घेते त्यादिवशी त्या पुढील वर्षीपासून तिचा वाढदिवस साजरा करण्याची पद्धत असते. स्वत:च्या वाढदिवसानिमित्त देखील गुगलने एक खास डूडल तयार करून ते शेअर केलं आहे.

एखादी वस्तू आपण ज्या दिवशी घरी आणतो, ती तारीख लक्षात ठेवून आपण त्या वस्तूचा वाढदिवस म्हणून सेलिब्रेशन करतो. पण ही बाब फक्त व्यक्तीपुरतीच मर्यादित नसून, वस्तूंना देखील लागू होते. मग ऑनलाईन जगतामध्ये सुद्धा विचार केला गेला तर एखादी वेबसाईट किंवा एखादी सेवा जेव्हा लोकार्पित होते, तो दिवस त्या वेबसाईटचा किंवा सेवेचा वाढदिवस मानायला हरकत नसावी. या नियमानुसार आज गुगल सेवेचा “हैप्पीवाला बर्थडे” आहे.

आपल्याला कोणत्याहि लहान सहन गोष्टीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर, आपण लगेच नेट ऑन करून गुगल वर त्याचा शोध घेतो. आणि गुगल आपल्यासाठी सतराशे साठ पर्याय समोर उपलब्ध करून देतो.  सध्या तरी अशी कोणतीही गोष्ट नसेल, जी गुगलवर उपलब्ध असेल. आपल्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यास गुगल सज्ज आहे. चला जाणून घेऊया थोडक्यात गुगलची जन्म कहाणी.

जगातील सर्वांत मोठं सर्च इंजिनमधील एक गुगल आहे. जगभरातील १०० पेक्षा अधिक स्थानिक भाषांमध्ये गुगलवर माहिती सहजपणे उपलब्ध होते. यामध्ये अनेक भारतीय भाषांचा देखील समावेश करण्यात आला आहे. कॅलिफोर्नियामधील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील दोन विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रथम गुगलच्या निर्मितीची कल्पना आली. १९९८मध्ये लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन या युवकांनी कल्पनाशक्तीच्या जोरावर कार्य करून, त्यांनी या सर्च इंजिनची निर्मिती केली. निर्मात्यांनी सुरुवातीला याला ‘बॅकरब’ असे नाव दिले होते, परंतु कालांतराने या सर्च इंजिनला गुगल असे नाव देण्यात आले. आणि जगणे हे नाव उचलून धरले.

सध्या मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरमध्ये सर्च इंजिन म्हणून गुगलचा वापर करता येतो. मनुष्याची जन्मतारीख ठरलेली असते, पण गुगलच्या बाबतीत मात्र असे काही घडले नाही. आतापर्यंत चार वेगवेगळ्या दिवशी गुगलचा वाढदिवस साजरा केला गेला असून, २७ सप्टेंबर रोजी गुगलने सर्वात जास्त पेजेस सर्च करण्याचा विक्रम स्वत:च्या नावे केला होता. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने अखेर हाच दिवस वाढदिवस म्हणून शिक्कामोर्तब केला. सध्याच्या घडीला २७ सप्टेंबर हा दिवस गुगलचा वाढदिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

RELATED ARTICLES

Most Popular