काल २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीतील प्रसिद्ध रत्नदुर्ग किल्ल्याच्या कड्यावर पायवाटेने फिरत असताना एक व्यक्ती तोल जाऊन घसरत कड्यावरून खाली गेला. परंतु केवळ देवाच्या कृपेने म्हणून तो सुमारे १५० फूट खोल समुद्रात थेट न पडता, तो मध्येच अडकून पडला. हा प्रकार घडल्यावर त्या व्यक्तीने मोठमोठ्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केल्याने, त्याचे ओरडणेऐकून तिथे फिरायला आलेल्या इतर पर्यटकांनी त्याला वरती काढण्यासाठी कसोसीचे प्रयत्न केले. स्थानिक रहिवासी, पोलीस व कोस्टल विभागाच्या कर्मचाऱ्यांपर्यंत माहिती गेल्यावर त्यांनी सुद्धा बरेच प्रयत्न केले.
दरीला अगदी लागूनच हि कड्यावरील पायवाट असल्याने त्यामुळे पावसाळ्यात ती वाट अजूनच निसरडी झालेली असते, त्यामुळे इतर वेळीही याठिकाणी जाण्यास पर्यटक धास्तावतात. मात्र काही निसर्गप्रेमीना मोह न आवरल्याने अशाप्रकारे काहीवेळा त्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. पायवाटेपासून दरीत सुमारे ३० ते ४० फूट खोल दरीत अडकलेल्या व्यक्तीला दोरीच्या सहाय्याने वर खेचल्याने त्याचा जीव वाचला असून मोठ्या अपघातातून त्याची सुटका झाली.
एकतर एका बाजूला खवळलेला समुद्र आणि खाली कातळ. कोणत्याही स्थितीमध्ये जर हा वरून थेट खाली पडला असतात तर नाहक आज जीव गमवला असता. किंवा मदत मिळण्यास जरा उशीर झाला असता तर, याठिकाणी असलेल्या बोचऱ्या थंडीत या व्यक्तीला रात्र काढावी लागली असती. केवळ नशीब बलवत्तर म्हणूनच हा बचावला. त्यामुळे प्रशासनातर्फे वारंवार आवाहन करून देखील पर्यटकांचा अति उत्साहीपणा असा नडू शकतो. त्यामुळे अनोळख्या ठिकाणी पर्यटनाला जाताना विशेष काळजी घ्यावी.