26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeTechnologyकोरोना सर्टिफिकेट एका क्लिकवर मिळणे सहज शक्य

कोरोना सर्टिफिकेट एका क्लिकवर मिळणे सहज शक्य

आत्ता फक्त काही मिनिटातच कोरोना सर्टिफिकेट एका क्लिकवर मिळणे सहज शक्य होणार आहे.    

राज्यामध्ये मागील वर्षापासून कोरोना महामारीचे आलेले संकट आणि शासनाच्या त्यावर सुरु असलेल्या उपाययोजना बऱ्याच प्रमाणामध्ये यशस्वी होताना दिसत आहेत. लसीकरणाचा वेग जास्तीत जास्त प्रमाणात वाढवत आल्याने, सध्या राज्यामध्ये कोरोना संक्रमणाची संख्या आटोक्यात यायला लागली आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये लस निर्माण झाल्याने, त्यामुळे कुठेतरी मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.

कोरोना लसीकरण ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सुरु करण्यात आले. सुरुवातीला वेबसाईटला ऑनलाईन लसीकरणासाठी नंबर लागणे  कठीण होऊन बनले होते, परंतु, त्यानंतर लसीकरणाचा वेग वाढल्याने, नागरिक सक्रीय  झाले आहेत. पण आता शासनाने लसिकरणापासून सर्टिफिकेट मिळण्याची प्रक्रिया सहज सोप्पी केली आहे. जाणून घेऊया थोडक्यात.

यापूर्वी देखील शासनाने लसीकरणासाठी नंबर लावण्यासाठी 90131 51515 हा नंबर दिला होता. आता याच नंबर वरून कोरोना सर्टिफिकेट मिळणेसुद्धा सहज शक्य होणार आहे. वरील नंबर मोबाइलमध्ये सेव्ह करून व्हाटसअप नंबर वरती इंग्लिश भाषेमध्ये Covid certificate असे टाईप करून पाठवणे, त्यानंतर ज्या नंबरवरून लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन केलेले आहे तो नंबर दर्शवून त्यावर ओटीपी पाठवला जातो. तो ओटीपी सुद्धा मेसेजमध्ये टाईप करून पाठवला असता, त्या नंबरवर रजिस्टर केलेली लसीकरणाची लिस्ट समोर दिसते.

समोर आलेल्या लिस्टमध्ये १,२,३,४ क्रमांकाप्रमाणे नावांची लिस्ट दिसेल. त्याप्रमाणे ज्या व्यक्तीचे प्रमाणपत्र हवे असेल त्या व्यक्तीचा क्रमांक मेसेजमध्ये पाठवला असता, पीडीएफ स्वरूपामध्ये निवडलेल्या व्यक्तीचे कोरोना लसीकरण सर्टिफिकेट त्वरित प्राप्त होते. त्यासाठी मोबाईल मध्ये पीडीएफ रीडर सारखे पीडीएफ उघडू शकणारे अप्लिकेशन असणे गरजेचे आहे. त्यामुळे आत्ता फक्त काही मिनिटातच कोरोना सर्टिफिकेट एका क्लिकवर मिळणे सहज शक्य होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular