23.3 C
Ratnagiri
Tuesday, February 4, 2025

राजापूर पालिकेच्या गोठ्याची दुरवस्था

तीव्र उतार आणि नागमोड्या वळणांच्या राजापूर शहरातील...

गावाचा सर्वांगीण विकास करणार – आ. शेखर निकम

गावाच्या विकासासाठी निधी, योजना आणि आवश्यक सुविधा...
HomeRatnagiriकोकण रेल्वे मार्गावर तोतया टीसींचा सुळसुळाट

कोकण रेल्वे मार्गावर तोतया टीसींचा सुळसुळाट

पोलिसांच्यावतीने वारंवार असे आवाहन करण्यात आली आहे कि, कोकण रेल्वे मार्गावर अशा प्रकारचे तोतया टीसींचा सुळसुळाट झाला असून, या मार्गावरील रेल्वे प्रवाशानी सावधगिरी बाळगावी

दि. २७ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर कोकणकन्या एक्स्प्रेसमध्ये सीएसएमटी ते मडगाव असा प्रवास करणाऱ्या नितीन संदीप कांबळी रा. कणकवली नामक प्रवाशाला एका तोतया टीसीने फसविल्याचे प्रकरण समोर आले आहे.

याबाबत कांबळी यांनी चिपळूण पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली असून याप्रकरणी नंदेश जयराम तांबे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकणकन्या एक्स्प्रेसने प्रवास करणारे नितीन कांबळी हे मुंबईहून मडगाव असे प्रवास करत असताना ते डी-२ या डब्यातून प्रवास करीत होते. यावेळी त्यांच्या डब्यात आलेल्या संबंधित तोतयाने टीसी आहे असे भासवून तुमचे तिकीट दाखवा अशी विचारणा केली असता, कांबळी यांनी आपल्या मोबाईलवर असलेले ऑनलाईन तिकीट आरोपीला दाखविण्यासाठी मोबाईल बाहेर काढला.

मात्र, ट्रेनमध्ये  नेटवर्क नसल्यामुळे तिकीट ओपन झाले नाही. आणि त्यांना ते या तोतयाला दाखवता आले नाही. अखेर त्या तोतया टीसीने कांबळी यांच्याकडे तिकीट नसल्याच्या कारणास्तव १५० रूपये  मागितले. यावेळी कांबळी यांनी घाबरून तोतया टीसीला १५० रूपये त्वरित दिले.

परंतु, कुठेतरी शंका आल्याने, या टीसीबाबत त्यांनी रेल्वे गार्डकडे चौकशी केली असता तो तिकीट चेकर नसून तोतया टीसी असल्याची त्यांची खात्री पटली. यानंतर त्यांनी या दरम्यान आलेल्या स्टेशन वर म्हणजेच चिपळूण पोलिस ठाण्यात ही खबर दिली.

पोलिसांच्यावतीने वारंवार असे आवाहन करण्यात आली आहे कि, कोकण रेल्वे मार्गावर अशा प्रकारचे तोतया टीसींचा सुळसुळाट झाला असून, या मार्गावरील रेल्वे प्रवाशानी सावधगिरी बाळगावी व अशाप्रकारची फसवणूक होत असल्याचा संशय आल्यास रेल्वे पोलिस अथवा स्थानिक पोलिसांशी संपर्क करावा.

RELATED ARTICLES

Most Popular