26.4 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeMaharashtraअटकेच्या भीतीने परमबीर सिंह यांनी देशाबाहेर पलायन केल्याचा संशय

अटकेच्या भीतीने परमबीर सिंह यांनी देशाबाहेर पलायन केल्याचा संशय

परमबीर सिंह वारंवार निर्देश देऊनही आयोगापुढे हजर राहत नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अँटीलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या एनआयएने अनेकदा समन्स पाठवून सुद्धा अद्यापपर्यंत त्यांना ते मिळालेले नाही. त्यामुळे एनआयए आणि महाराष्ट्र राज्यातील चौकशी एजन्सींनी संशय व्यक्त केला आहे की, कदाचित अटकेच्या भीतीने ते देश सोडून पळून गेले आहेत.

तपास यंत्रणांना परमबीर सिंह यांच्या बद्दल मिळालेल्या माहितीनुसार दाट संशय आहे कि, ते युरोपातील देशात जाऊन कुठेतरी लपले असावेत. परंतु, अद्याप यंत्रणांना त्या संदर्भातील ठोस पुरावा मिळालेला नाही. तीन ठिकाणी परमबीर सिंह यांच्याविरोधात वॉरंट बजावण्यात आले असून, या तिन्ही ठिकाणी ते उपलब्ध  असल्याची माहिती पोलिसांनी २२ सप्टेंबर रोजी चांदिवाल आयोगापुढे सादर केल्यामुळे परमबीर सिंह नेमके आहेत तरी कुठे? असा सवाल उभा राहत आहे.

परमबीर सिंह वारंवार निर्देश देऊनही आयोगापुढे हजर राहत नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगासमोर सातत्याने गैरहजर राहण्यामुळे परमबीर सिंह यांच्या विरोधीत चांदिवाल आयोगानं वॉरंट जारी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मलबार हिलसह, पंजाबमधील चंडीगढच्या दोन पत्यांवर मुंबई पोलिसांनी हे वॉरंट बजावले, पण परमबीर या दोन्ही ठिकाणी आढळून आले नाहीत.

परमबीर सिंह चौकशीला सातत्याने गैरहजर राहिले आहेत. आयोगाने याची दखल घेत सुरूवातीला जून महिन्यात परमबीर यांना ५ हजारांचा,  १९ ऑगस्टला २५ हजाराचा आणि २५ ऑगस्टला पुन्हा २५ हजाराचा दंड ठोठावला आहे. सदर दंडाची रक्कम मुख्यमंत्री कोविड मदतनिधीत जमा करण्याचे निर्देश देत ३० ऑगस्टला सुनावणी निश्‍चित करण्यात आली होती. अखेरची संधी म्हणून ६ ऑक्टोबरच्या सुनावणीमध्ये हजार राहण्याचे निर्देश देण्यात आलेले, पण त्यांचा काहीच अतापता सापडत नाही आहे.

RELATED ARTICLES

Most Popular