29.1 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...

चिपळूण रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या मार्गाची दुरवस्था

शहरातून कोकण रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याची सध्या...
HomeRatnagiriअखेर त्या कामगारांचे थकीत वेतन अदा, मनसे इफेक्ट

अखेर त्या कामगारांचे थकीत वेतन अदा, मनसे इफेक्ट

गरज पडली तर रत्नागिरीतील पदाधिकारीही रायगडमध्ये येऊ, असे सांगितले.

रत्नागिरीतील एका आईस कोल्ड स्टोरेज कंपनीमधील ६६ कामगारांचा दोन वर्षांचा पगार थकीत असून, अद्याप दिला गेला नसल्याची तक्रार कामगार कार्यालयामध्ये कामगारांनी केली. मच्छी निर्यात करणारी पेठकिल्‍ला मार्गावरील एक कंपनी तीन वर्षांपूर्वी अचानक बंद करण्यात आली परंतु, या कंपनीकडून एकूण ६६ कामगारांचा पगारच देण्यात आला नसल्याची तक्रार आली. मनसे कामगार सेना जिल्हा चिटणीस सुनील साळवी, रोजगार जिल्हा संघटक रूपेश जाधव, माथाडी सेनेचे जिल्हा चिटणीस आणि मनविसेचे जिल्हाध्यक्ष गुरूप्रसाद चव्हाण यांनी आलेल्या कामगारांची व्यथा ऐकून लगेचच त्यावर कृती करायला सुरुवात केली.

मनसेच्या विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी केलेल्या या कामामुळे इतर कंपन्यांमधील असेच पीडित कामगार कार्यालयामध्ये येऊन आपल्या व्यथा मांडू लागले आहेत. त्याबाबत आठवड्यापूर्वी रत्नागिरीतील शिपयार्ड कंपनीतील कामगारांचा थकलेला पगार मिळवून देण्यासाठी मनसेच्या पदाधिकार्‍यांनी कंपनीत जाऊन जाब विचारला होता.परंतु, आता मनसेने दिलेल्या दणक्याने चौगुले लावगण शिपयार्डमधील ठेकेदाराने कामगारांचा पगार त्वरित अदा केला आहे.

या प्रकरणी मनसे पदाधिकार्यांनी जरी कंपनी बंद करण्यात आली तरी, आईस कोल्ड स्टोरेज कंपनी मालकाचे वारस कुठे राहतात, याची माहिती शोधली. रायगडमधील तळोजा येथे या वारसांची कंपनी असल्याचे कळताच रायगडातील मनसेचे उपचिटणीस विजय पवार यांच्याशी संपर्क साधून सहकार्य करण्यास सांगितले. इतकेच नव्हे तर गरज पडली तर रत्नागिरीतील पदाधिकारीही रायगडमध्ये येऊ, असे सांगितले. मनसेच्या या कार्यपद्धतीमुळे कामगारांचा विश्‍वास अजून दृढ झाला.

याचा परिणाम असा झाला कि, ११ कामगारांच्या वेतनाचे १ लाख ७५ हजार रूपये ठेकेदाराने त्वरित अदा केले. मनसेच्या इफेक्टमुळे थकीत पगार मिळाल्याने आनंदित झालेल्या कामगारांनी मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात जाऊन मनसे पदाधिकार्‍यांचे पत्र देऊन आभार मानले.

RELATED ARTICLES

Most Popular