27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriगणपतीपुळे येथील वॉटर स्पोर्ट्स अनुभवण्यासाठी करावी लागणार प्रतीक्षा

गणपतीपुळे येथील वॉटर स्पोर्ट्स अनुभवण्यासाठी करावी लागणार प्रतीक्षा

वॉटर स्पोर्टसला जिल्ह्यात सुरुवात झालेली नसल्याने, १५ ऑक्टोबरनंतर ही सुरुवात होण्याची शक्यता व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.

७ ऑक्टोबर घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघडणार असून, रत्नागिरीतील प्रसिद्ध आणि पर्यटकांच्या विशेष आवडीचे तीर्थक्षेत्र गणपतीपुळे मंदिरही दर्शनासाठी खुले होणार आहे. त्यामुळे कोरोना काळानंतर साधारण सात महिन्यानंतर पुन्हा स्थानिक पर्यटन व्यवसायाला चालना मिळायला सुरुवात होणार आहे.

कोरोनामुळे गेली दीड वर्ष सर्व पर्यटन व्यवसाय ठप्पच आहेत. त्यांना आता कुठे थोडी गती मिळू लागली आहे. रत्नागिरी अनलॉक झाल्यानंतर हळूहळू पर्यटकांची पावले जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांकडे वळू लागली आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, पश्चिम महाराष्ट्रासह अनेक पर्यटक कुटुंबीयांसह वीकेंडची मज्जा लुटायला कोकणात दाखल होत आहेत. कोरोनामुळे हैराण झालेले हॉटेल व्यावसायिक आता येणारऱ्या पर्यटकांमुळे सुखावले आहेत.

गणपतीपुळे येथे पर्यटकांसाठी वॉटर स्पोर्ट्स सुद्धा सुरु करण्यात आले असून, मात्र, कोरोनामुळे फक्त औपचारिक रित्या त्याचे उद्घाटन करण्यात आले असून, हवामानातील सततच्या बदलामुळे, समुद्र खवळलेला असून बोटी चालवणे अशक्य झाले आहे. तसेच पर्यटन व्यवसायासाठी लागणाऱ्या कागदोपत्री परवानग्यांसाठी देखील पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागत असल्याने, सध्या रत्नागिरी गणपतीपुळे येथे वॉटर स्पोर्टसचा थरार अनुभवण्यासाठी काही कालावधी लोटणार असून, प्रतिक्षा करावी लागणार आहे.

जिल्ह्यात गणपतीपुळे,आरे-वारे गुहागर, मुरूड, दापोली येथे वॉटर स्पोर्टस सुरू करण्यात आले आहेत. गणपतीपुळे समुद्रकिनारी १७ बोटी असून ७ जेट स्की उपलब्ध आहेत. यावर शंभरहून अधिक स्थानिक लोकांचा रोजगार अवलंबून आहे. जिल्ह्यात दापोली, गुहागर समुद्रकिनारा, गणपतीपुळे, मालगुंड समुद्र किनाऱ्यावर बॉटर स्पोर्टस्, पॅरासेलिंग, जेटस् स्की, बनाना रायडिंग, बोटिंग यासह रत्नागिरी स्कुबा डायव्हिंगची व्यवस्था आहे. मात्र, अद्याप वॉटर स्पोर्टसला जिल्ह्यात सुरुवात झालेली नसल्याने, १५ ऑक्टोबरनंतर ही सुरुवात होण्याची शक्यता व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular