23.8 C
Ratnagiri
Tuesday, December 9, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriअन्न व्यावसायिकांना विक्री बिलावर परवाना क्रमांक बंधनकारक

अन्न व्यावसायिकांना विक्री बिलावर परवाना क्रमांक बंधनकारक

अन्न व्यावसायिकांनी विनापरवाना अथवा विना नोंदणी व्यवसाय करू नये. जर नोंदणी केलेली नसेल तर, त्वरित अधिकृत संकेतस्थळावर नोंदणीसाठी अर्ज करावा,  असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही अन्नपदार्थाची विक्री करणार्‍या आस्थापनांनी बिलावर त्यांचा अन्न परवानावरील नोंदणी प्रमाणपत्र क्रमांक टाकणे सक्तीचे करण्यात आले आहे. १ ऑक्टोबरपासून केंद्रीय अन्नसुरक्षा मानदे प्राधिकरणाने जारी केलेल्या या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

अन्नपदार्थ विक्री करताना बिलावर अन्नपरवाना क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. व्यावसायिक मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे ग्राहक सुद्धा अन्नपदार्थ खरेदी करताना केवळ नोंदणी धारकांकडूनच खरेदी करावी, याबाबत जागरूक दिसत नाहीत. यापुढे जर अन्न व्यावसायिकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

सर्व अन्न व्यावसायिकांनी त्यांच्या विक्री बिलावर परवाना क्रमांक/नोंदणी क्रमांक नमूद करणे १ ऑक्टोबर २०२१ पासून बंधनकारक करण्यात आले असून सर्व ग्राहकांनी सुद्धा खरेदी करताना विक्री बिलावर परवाना किंवा नोंदणी क्रमांक नमूद असलेल्या नोंदणीकृत आस्थापना आहेत ना याची खात्री करावी. अन्न व्यावसायिकांनी विनापरवाना अथवा विना नोंदणी व्यवसाय करू नये. जर नोंदणी केलेली नसेल तर, त्वरित अधिकृत संकेतस्थळावर नोंदणीसाठी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

१ ते ७ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून,  सर्व अन्न व्यावसायिकांनी त्यांच्या उलाढालीनुसार आवश्यक परवाना किंवा नोंदणी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन रत्नागिरी या कार्यालयात अन्न व औषध परवानाधारकांच्या सुविधेसाठी माफक दरात सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या सेतू सुविधा केंद्राचा अन्न व औषध व्यावसायिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन रत्नागिरी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular