21.6 C
Ratnagiri
Tuesday, December 9, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRajapurडॉ. राजन साळवी यांची आरोग्य मंत्री नाम.राजेश टोपे यांच्याकडे विशेष मागणी

डॉ. राजन साळवी यांची आरोग्य मंत्री नाम.राजेश टोपे यांच्याकडे विशेष मागणी

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमाण बऱ्यापैकी आटोक्यात आल्याने, जिल्ह्यातील २९ कोरोना केंद्रे बंद करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य शिकीत्सक डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली आहे. राजापूरचे क्रियाशील आमदार डॉ. राजन साळवी यांनी आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांना राजापूर तालुक्यातील ओणी कोव्हिड सेंटर येथे ट्राम केअर सेंटर सुरु करणेबाबत निवेदन देऊन मागणी केली असता आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांनी सकारत्मकता दर्शवली आहे.

कोरोना महामारीच्या काळात राजापूर तालुक्यामध्ये मुंबई-गोवा महामार्गावर ओणी येथे आरोग्य विभागाच्या मालकीच्या इमारतीमध्ये २० बेड व ५ आय.सी.यु बेड असे अद्यावत कोव्हिड हॉस्पिटल सुरु करण्यात आले असून त्यासाठी रुपये १ कोटी इतका खर्च करण्यात आलेला आहे. परंतु सद्या कोरोनाची पार्श्वभ्मी पाहता, कोरोना संसर्ग कमी झाला असुन रुग्ण नसल्याने सदर हॉस्पिटल बंद स्थितीमध्ये आहेत.

राजापूर ओणी या ठिकाणी सुपर मल्टीस्पेशल हॉस्पिटल होणेसाठी बांधकाम विभागाने आरोग्य विभागाला जागा दिली असुन भविष्यात शासन स्तरावर निधीची तरतूद झाली, तर सदर ठिकाणी सुपर मल्टीस्पेशल हॉस्पिटल उभे करण्याचा मानस आहे. परंतु, सदर हॉस्पिटल बांधण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लोटणार आहे.

त्या अनुषंगाने आम डॉ. राजन साळवी यांनी, आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांची प्रत्येक्ष भेट घेऊन मुंबई – गोवा महामार्गावर होणा-या अपघाताची संख्या पाहता अपघातात जखमी होणाऱ्या रुग्णांसाठी ओणी येथील जे कोव्हिड हॉस्पिटल उभरलेले आहे, त्या इमारतीमध्ये ट्रामा केअर सेंटर सुरू करणेच्या अनुषंगाने अद्यावत यंत्रणा व वैद्यकीय कर्मचारी वर्गासह मंजूरी मिळण्याची मागणी केली आहे. आम. डॉ.राजन साळवीच्या मागणीचा विचार करता आरोग्य मंत्र्यांनी संबंधित विभागाकडून त्वरित माहिती घेऊन, ओणी कोव्हिड सेंटर येथे ट्राम केअर सेंटर सुरु करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular