23.9 C
Ratnagiri
Monday, February 16, 2026

संगमेश्वर तालुक्यात जंगलतोड कोसुंबमध्ये लाकडाचा साठा

गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात विनापरवाना जंगलतोड...

काजिर्डा घाटरस्ता, सर्वेक्षणाला चालना एक कोटीची तरतूद

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह घाटमाथ्यावरील कोल्हापूर जिल्हा...

कोकण कन्या पाठोपाठ मांडवी एक्सप्रेसही खोळंबल्याने दादर स्थानकावर प्रवाशांचा संताप

मुंबईच्या दिशेने येणारी 'कोकण कन्या एक्सप्रेस' मार्गात...
HomeRajapurकिरकोळ अपघातानंतर जैतापूरचे काँग्रेस ज्येष्ठ नेते शरफुद्दीन काझी यांचे निधन

किरकोळ अपघातानंतर जैतापूरचे काँग्रेस ज्येष्ठ नेते शरफुद्दीन काझी यांचे निधन

दळे ग्रुप ग्रामपंचायतमध्ये ते अनेक वर्षे सदस्य म्हणून कार्यरत होते.

राजापूर तालुक्यातील दळे-जैतापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते शरफुद्दीन फकूमिया काझी (६५) यांचे मंगळवारी दुपारी आकस्मिक निधन झाले. एका छोट्याशा अपघाताचे निमित्त ठरून त्यांचे अचानक जाणे ही तालुक्यासह संपूर्ण परिसरासाठी अत्यंत धक्कादायक घटना ठरली आहे. मंगळवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास ते आपल्या चारचाकी वाहनाने परिसरातील चव्हाणवाडी येथे जात असताना त्यांच्या वाहनाला एक किरकोळ अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांनी तात्काळ त्यांना साखरकोंबे येथील एका खाजगी डॉक्टरांकडे नेऊन तपासणी केली. प्राथमिक तपासणीत कोणतीही गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले नव्हते. मात्र काळजी म्हणून त्यांना पुढील तपासणीसाठी रत्नागिरी येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. रत्नागिरी येथे पोहोचल्यानंतर मात्र त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

त्यांच्या या आकस्मिक निधनाम ळे राजापूर तालुक्यासह दळे, जैतापूर परिसरात संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा पसरली आहे. शरफुद्दीन काझी हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे कट्टर व निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते. त्यांनी राजापूर तालुका काँग्रेस सरचिटणीस पदाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळली होती. तसेच जैतापूर जमात मुस्लिम कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे समाजासाठी उल्लेखनीय कार्य केले. याशिवाय त्यांनी जैतापूर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पदही अनेक वर्षे भूषविले होते. दळे ग्रुप ग्रामपंचायतमध्ये ते अनेक वर्षे सदस्य म्हणून कार्यरत होते. जैतापूर सागरी विभागात काँग्रेस पक्षाचा एक विश्वासू आणि सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. ते श्रमिक पतपेढी साखरचे संचालक देखील होते.

सामाजिक व राजकीय कार्यासोबतच ते परिसरात चिरेखाण व्यावसायिक, तसेच स्वामील व्यावसायिक व आंबा बागायतदार म्हणूनही परिचित होते. त्यांच्या सामाजिक जाणिवा, सर्वसाम ान्यांशी असलेली आपुलकी आणि संघटनात्मक कौशल्य यामुळे त्यांना सर्व स्तरातून आदराने पाहिले जात होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असून बुधवारी जैतापूर येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, मुलगी, नातवंडे, भाऊ असा मोठा परिवार आहे. शरफुद्दीन काझी यांच्या निधनाने एक अनुभवी राजकीय कार्यकर्ता, सम ाजसेवक आणि लोकसंपर्क असलेले नेतृत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular