24.6 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeTechnologyसायबर गुन्ह्यांपासून सावधानतेचा इशारा

सायबर गुन्ह्यांपासून सावधानतेचा इशारा

जगभरामध्ये मोठ्या शहरांपासून ते लहान ग्रामीण भागापर्यंत हल्ली सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. त्यामुळे अनेकदा सावध करून देखील अनेक सुशिक्षित तसेच अशिक्षित लॉक सुद्धा अशा फसव्या गोष्टीना बळी पडलेले दिसतात.

कोणत्याही नोकरदार व्यक्तीसाठी, रिटायरमेंट नंतर आर्थिक आधार म्हणजे पीएफ ची रक्कम. ही रक्कम भविष्यातील सुरक्षिततेसाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे. यामध्ये पैसे जमा केले जातात, तसेच त्या पीएफवर व्याज देखील उपलब्ध असते. अशा परिस्थितीत,  तुम्ही तुमच्या पीएफ पैशांबाबत खूप सतर्क असणे गरजेचे आहे.

ईपीएफओने आपल्या ट्विटर हँडलवर सायबर गुन्ह्यांबद्दल माहिती दिली आहे. अशातच वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या सर्व ग्राहकांना अलर्ट घोषित केला आहे. ईपीएफओने आपल्या ६ कोटी पीएफ खातेधारकांना वैयक्तिक माहिती आणि कोणत्याही प्रकारचे अॅप डाउनलोड करण्याबाबत अलर्ट केले आहे.

ईपीएफओच्या नावाने येणाऱ्या फेक फोन कॉल्सपासून नेहमी सावध राहाणे गरजेचे आहे. याशिवाय ईपीएफओची बनावट वेबसाईट वापरूनही अनेक ग्राहकांना फसवण्यात येण्याच्या अनेक घटना आपण एक दिवस आड ऐकतच असतो. त्यामुळे, त्याविषयी प्रत्येकाने जागरुक राहणे आवश्यक आहे. जर तुम्ही ईपीएफओच्या अलर्टकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल आणि तुमच्यासोबत आर्थिक फसवणूक होऊ शकते.

ईपीएफओने अलर्टमध्ये म्हटले आहे कि, ईपीएफओ कधीही फोन कॉल करून आपल्या खातेधारकांकडून यूएएन नंबर, आधार , पॅन नंबर किंवा बँकचे कोणतेही तपशील विचारत नाही. किंवा ईपीएफओ त्याच्या खातेधारकांना कोणताही फोन कॉलच करत नाही.

देशभरातील विविध बँकांकडून देखील ग्राहकांसाठी अशाप्रकारचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही गुन्हेगार  बँकां, RBIचे अधिकारी बनून ग्राहकांना फोन करतात आणि त्यांची फसवणूक करतात. यामुळे ग्राहकांचा निधी धोक्यात येऊ शकतो. बँकानी त्यांच्या अधिकृत वेबसाइट्सवरुन आणि सोशल मीडिया हँडल्सवरून याबाबत अलर्ट जारी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular