27.3 C
Ratnagiri
Wednesday, September 3, 2025

गणेशोत्सवात ‘कोरे’चा प्रवाशांना दिलासा…

कोकण रेल्वे प्रशासनाने यंदा गणेशोत्सवासाठी केलेल्या विशेष...

चिपळूण पालिकेच्या इमारतीचा वापर थांबवा

पालिकेची मुख्य इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक...

मुंबईतून ‘रो-रो बोट’ साडेसात तासांत रत्नागिरीत…

मुंबई ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग रो-रो बोट सेवेची चाचणी...
HomeMaharashtraमहाराष्ट्र बंद १००% यशस्वी झाला !!

महाराष्ट्र बंद १००% यशस्वी झाला !!

आधीच कोरोनामुळे गेली दीड-दोन वर्षे व्यापारी आर्थिक संकटाचा सामना करत आहे. आणि आता कुठे काही प्रमाणात सर्व स्थिरस्थावर सुरळीत होते आहे,  त्यात असे बंद व्यापार्‍यांना परवडणारे नाहीत

कालच्या महाराष्ट्र बंदला अनेक ठिकाणी संपूर्ण प्रतिसाद मिळाला असून, काही ठिकाणी मात्र संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. महाविकास आघाडीनेच संप पुकारला तर न्याय मागायचा कुठे ! अशी अनेकांची मते बनली. काही पक्षांनी या बंदला विरोध दर्शविला असून, काहींनी पाठींबा दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद वरून भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. राज्यातील लोकं आधीच कोरोना संकटामुळे हैराण झाली आहेत. त्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका,  नाहीतर जनतेचा उद्रेक कधी होईल, हे सांगता येणार नाही, असा इशारा देतानाच महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही की कोणाच्याही सांगण्यावरून बंद करता येईल, हे दाखवण्यासाठी बाहेर पडा, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे.

या संदर्भात निलेश राणे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. आज दिवसभराच्या कामासाठी माझ्या कार्यालयात पोचलो आहे. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचे दैनंदिन विषय हाताळावेत,  कुठल्याही ‘महाराष्ट्र बंद’ ला भीक न घालता आपापलं काम पूर्ण करावं. महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही की कोणाच्याही सांगण्यावरून बंद करण्यात येईल हे दाखवण्यासाठी बाहेर पडा” असं आवाहन त्यांनी ट्विटरवर केलं आहे.

मनसेने देखील या महाराष्ट्र बंदच्या विरोधातच मत नोंदवले आहे. लखिमपूर खीरी येथे घडलेली घटना हि अत्यंत दुर्दैवी असून त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. मनसेने त्याचा निषेधच केला आहे. पण महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की,  महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षानीच महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यामागे नेमके काय लॉजिक आहे ! कळतच नाही.

आधीच कोरोनामुळे गेली दीड-दोन वर्षे व्यापारी आर्थिक संकटाचा सामना करत आहे. आणि आता कुठे काही प्रमाणात सर्व स्थिरस्थावर सुरळीत होते आहे,  त्यात असे बंद व्यापार्‍यांना परवडणारे नाहीत आणि निषेध करायचाय तर अन्य मार्गाने करावा. बंदच का? सरकारच बंद करणार असेल तर गार्‍हाणं मांडायचं तरी कोणाकडे?  या बंदमध्ये सामिल न होता व्यापार्‍यांनी काळ्या फिती लावून आपली दुकाने चालू ठेवावीत,  असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular